नागपुरात भीषण अपघात; कारचा चक्काचूर, ४ आयटी कर्मचारी ठार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, December 25, 2020

नागपुरात भीषण अपघात; कारचा चक्काचूर, ४ आयटी कर्मचारी ठार

https://ift.tt/3prBPdN
नागपूर: नागपुरातील परिसरात आज, पहाटेच्या सुमारास भीषण झाला. एका कारला ट्रेलरने उडवले. यात एकाच कंपनीतील चौघे जण ठार झाले. तर एकावर उपचार सुरू आहेत. मिहान परिसरातील खापरी पुलावर हा भीषण अपघात झाला. एका कारला भरधाव ट्रेलरने उडवले. यात कारमधील चौघे जण ठार झाले. तर एक जण जखमी झाला. बालचंद उइके, पीयूष टेकाडे, नेहा गजभिये आणि पायल कोचे अशी मृतांची नावे आहेत. तर आशिष सरनायल यांच्यावर सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व कर्मचारी एग्जावेअर कंपनीतून काम संपवून कारने घरी परतत होते. त्याचवेळी शुक्रवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास खापरी पुलावर त्यांच्या कारला ट्रेलरने उडवले. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा चक्काचूर झाला आहे. मृत आणि जखमी कर्मचारी हे एकाच कंपनीतील कर्मचारी होते. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व कर्मचारी कंपनीतून शिफ्ट संपवून घरी कारने परतत होते. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिहान पुलाजवळ भरधाव ट्रेलरने त्यांच्या कारला समोरून धडक दिली. यात चौघे जण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सोनेगाव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून, तपास सुरू आहे.