
नवी दिल्ली: भारतासह जगभरातील १८० हून अधिक देश करोनाच्या () विळख्यात सापडले आहेत. देशभरात संसर्ग (corona virus infection) झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ९६.७७ लाखांहून अधिक झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांमध्ये करोनाचे ३२ हजार ९८१ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर देशातील एकूण करोना बाधितांची संख्या ९६ लाख ७७ हजार २०३ वर पोहोचली आहे. तसेच गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दररोज मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३ जुलैनंतरची सर्वात कमी आहे. तर आतापर्यंत झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १ लाख ४० हजार ५७३ इतकी झाली आहे. (see what is latest situation of in india) देशात एकूण सक्रीय रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. २० जुलैनंतर पहिल्यांदाच सक्रिय रुग्णांची संख्या इतकी कमी झालेली आहे. आज प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये ३९,१०९ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ९१ लाख ३९ हजार ९०१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. दररोज वाढ होणाऱ्या रुग्णसंख्येत घट होत असून बरे होणाऱ्या रुग्णसंख्येतही वाढ होताना दिसत आहे. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्याही कमी होताना दिसत आहे. देशात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३ लाख ९६ हजार ७२९ इतकी झाली आहे. देशात करोना रुग्ण बरे होण्याचा दर ९४.४४ टक्के इतका आहे. तर संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ४.०९ टक्के इतका आहे. तसेच मृत्युदरही १.४५ टक्के आणि पॉझिटीव्हीटीचा दर अर्थात चाचणीत संक्रमण झाल्याचा दर ४.११ टक्के इतका आहे. क्लिक करा आणि वाचा- चाचण्यांबाबत बोलायचे झाल्यास, गेल्या २४ तासांमध्ये ८ लाख १ हजार ८१ इतक्या चाचण्या घेण्यात आल्या तर आतापर्यंत एकूण १४ कोटी ७७ लाख ८७ हजार ६५६ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-