
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारनं घाईघाईत आणलेल्या कृषी कायद्यांचा शेतकरी संघटनांकडून विरोध सुरू आहे. या कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाचा आज २६ वा दिवस आहे. या दरम्यान या आंदोलनाची माहिती सोशल मीडियाद्वारे पोहचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी तयार करण्यात आलेलं एक आणि इन्स्टाग्राम पेज अचानक 'ब्लॉक' करण्यात आलेलं दिसलं. यानंतर मात्र, सरकारकडून लादल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेन्सॉरशीपबद्दलची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. सोशल मीडियावर सरकारवर अनेकांनी टीकाही केली. त्यानंतर तीन तासांनी केलेलं पेज पुन्हा सुरू झालं. रविवारी सायंकाळी अचानक फेसबुककडून ७ लाखांहून अधिक फॉलोअर्स असणारं ''चं पेज ब्लॉक करण्यात आलं. एका लाईव्ह व्हिडिओनंतर हे पेज ब्लॉक करण्यात आलं होतं. त्यामुळे 'किसान एकता मोर्चा'च्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजवरून कोणतीही माहिती शेअर करता येत नव्हती. शेतकरी संघटनांकडून पत्रकार परिषदेत माहिती दिल्यानंतर योगेंद्र यादव एक फेसबुक लाईव्ह करत असतानाच हे फेसबुक पेज बंद झालं होतं. फेसबुक नियमांच्या उल्लंघनामुळे हे पेज ब्लॉक करण्यात आल्याचं फेसबुककडून सांगण्यात येत असल्याचं या फेसबुकच्या मॅनेजरनं म्हटलं. शेतकरी आंदोलकांकडून ही सरकारची असल्याचा आरोप करण्यात आला. टीकेनंतर मात्र फेसबुकनं किसान एकता मोर्चाचं पेज पुर्ववत केलं. तसंच इन्स्टाग्रामवर नवीन कंटेन्ट अपलोड करण्यात आलेली बंदीदेखील हटवण्यात आली. गेल्या तीन आठवड्यांहून अधिक काळापासून शेतकरी सीमेवर ठाण मांडून बसलेत. सरकारशी झालेल्या सगळ्या चर्चा निष्फळ ठरल्यात. मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी संघटना अडून बसल्यात. या संघटनांनी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या किमान हमीभावाच्या आश्वासनांवर विश्वास ठेवण्यास नकार दर्शवलाय.