रहाणेच्या नेतृत्वात भारताने इतिहास घडवला; बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियावर ८ विकेटनी विजय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, December 29, 2020

रहाणेच्या नेतृत्वात भारताने इतिहास घडवला; बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियावर ८ विकेटनी विजय

https://ift.tt/34QohRu
मेलबर्न: India won ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ८ विकेटनी शानदार विजय मिळवला. गोलंदाज आणि फलंदाजांनी केलेल्या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर भारताने हा विजय साकारला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. बॉक्सिंग डे कसोटीत विजय मिळवण्याची भारताची ही सलग दुसरी वेळ आहे. याआधी २०१८ साली भारताने प्रथम बॉक्सिंग डे कसोटीत विजय मिळवला होता. या विजयासह भारताने २०२०मधील अखेरी लढत जिंकली आणि चाहत्यांना ३१ डिसेंबरची भेट दिली. वाचा- एडिलेड कसोटीत ३६ धावांवर ऑल आउट झाल्यानंतर भारताचा ८ विकेटनी लाजिरवाणा पराभव झाला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात नियमीत कर्णधार विराट कोहली आणि जलद गोलंदाज मोहम्मद शमी यांच्या शिवाय उतरलेल्या भारतीय संघाने कमाल केली. अजिंक्य रहाणेने फलंदाजीत शतकी खेळी करून टीकाकारांना चोख उत्तर दिले. पण त्याच वेळी उत्तम कर्णधार कसा असतो हे देखील दाखून दिले. वाचा- दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या तळातील फलंदाजांनी ६४ धावांची भर टाकली. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २००वर संपुष्टात आल्याने भारताला विजयासाठी ७० धावांची गरज होती. विजयासाठीचे सोपे लक्ष्य पार करताना भारताची सुरूवात खराब झाली. सलामीवीर मयांक अग्रवाल पुन्हा एकदा धावा करण्यात अपयशी ठरला. तो पाच धावावर करून बाद झाला. त्यानंतर आलेला अनुभवी चेतेश्वपर पुजारा देखील लवकर बाद झाला. पुजाराला कमिन्सने ३ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर शुभमन गिल (नाबाद ३५) आणि (नाबाद-२७) यांनी विजयासाठीची औपचारिकता पूर्ण केली. वाचा- .. त्याआधी ऑस्ट्रेलियाने कालच्या ६ बाद १३६ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. कॅमरून ग्रीन आणि पॅट कमिन्स हे दोघे मैदानावर होते. पहिल्या काही ओव्हर भारतीय गोलंदाजांनी ही जोडी फोडण्याचे खुप प्रयत्न केले पण त्याला यश मिळाले नाही. अखेर ९० षटकानंतर नव्या चेंडूने जसप्रीत बुमराहने भारताला ब्रेक मिळून दिला. त्याने पॅट कमिन्सला २२ धावांवर बाद केले आणि ऑस्ट्रेलियाची सातवी विकेट घेतली. या दोघांनी ५७ धावांची भागिदारी केली. त्यानंतर पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलिया दोन धक्के दिले. त्याने प्रथम कॅमरून ग्रीनला ४५ धावांवर माघारी पाठवले आणि मग नॅथन लायनला जडेजाकडे कॅच देण्यास भाग पडले. दुसऱ्या सत्राचा खेळ संपण्याआधी अश्विनने जोश हेजलवुडची बोल्ड काढली आणि ऑस्ट्रेलियाचा २०० धावांवर ऑल आउट केला. वाचा- दुसऱ्या डावात भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. बुमराह, अश्विन, जडेजा यांनी प्रत्येकी २ तर यादवने एक विकेट घेतली. स्कोअरबोर्ड- ऑस्ट्रेलिया: पहिला डाव- १९५/१० (लाबुशाने-४८, बुमराह-४ विकेट) भारत: पहिला डाव- ३२६/१० (रहाणे-११२, लायन-३ विकेट) ऑस्ट्रेलिया: दुसरा डाव- २००/१० (ग्रीन-४५,सिराज-३ विकेट) भारत: दुसरा डाव- ७०/२ (गिल-३५*) चार सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी दोन्ही संघातील तिसरा कसोटी सामना ७ ते ११ जानेवारी दरम्यान होणार आहे. ही लढत नियोजित कार्यक्रमानुसार सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहे. पण तेथे करोना रुग्णांची संख्या वाढल्याने ही लढत मेलबर्न मैदानावर होण्याची शक्यता आहे.