फसलेले बंड शिवसेना नगरसेवकांच्या अंगलट, 'अशी' झालीय गोची - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, December 8, 2020

फसलेले बंड शिवसेना नगरसेवकांच्या अंगलट, 'अशी' झालीय गोची

https://ift.tt/2K5uFwo
अहमदनगर: शिवसेनेतून बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या आणि आघाडी धर्मासाठी पुन्हा स्वगृही परतावे लागलेल्या पारनेरच्या नगरसेवकांची सध्या मोठी गोची झाली आहे. शिवसेनेचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी त्यांना स्वीकारायला तयार नाहीत तर दुसरीकडे उघडपणे राष्ट्रवादीसोबतही जाता येत नाही. तक्रार केली तर पक्षाचे वरिष्ठ नेतेही केवळ ऐकून घेत आहेत. त्यामुळे नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावर हे बंड त्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. सोमवारी रात्री या नगरसेवकांनी पक्षाचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांची पुन्हा भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. (Shiv Sena Rebel Corporators from Parner) जुलै महिन्यात शिवसेनेचे हे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले होते. पारनेरचे आमदार यांच्या नेतृत्वाखाली बारामती येथे जाऊन उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. हे नगरसेवक राष्ट्रवादीने फोडल्याचा आरोप झाला होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नागमोडी राजकारणाची मोठी चर्चा झाली. या नगरसेवकांपेक्षा राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनाच यासाठी जबाबदार धरले जाऊन शिवसेनेकडून प्रचंड नाराजी व्यक्त झाली. त्यामुळे अखेर राष्ट्रवादीने हे नगरसेवक पुन्हा शिवसेनेत पाठविले. लंके यांच्या उपस्थितीतच मातोश्रीवर मुख्यमंत्री यांच्या हस्ते या नगरसेवकांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. यापुढे या नगरसेवकांना शिवसेनेत सन्मानाची वागणूक दिली जाईल, असे अश्वासन यावेळी देण्यात आले. वाचा: प्रत्यक्षात पारनेरला परतल्यापासून या नगरसेवकांना स्थानिक शिवसेनेने स्वीकाले नाही. माजी आमदार विजय औटी यांच्यावर नाराजी व्यक्त करीत हे नगरसेवक राष्ट्रवादीत गेले होते. आता ते शिवसेनेत परतले असले तरी औटी गटाशी त्यांचे मनोमिलन झालेच नाही. त्यामुळे त्यांना शिवसेनेच्या उपक्रमांपासून दूरच ठेवण्यात येत आहे. आघाडी धर्माचे पालन करायचे म्हणून त्यांना पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश देणेही कठीण आहे. त्यामुळे मानसिक दृष्ट्या ते शिवसेनेपासून दूर आणि लंके यांच्या जवळ असले तरी तांत्रिक दृष्ट्या त्यांना तसे करता येणार नाही. त्यामुळे लवकरच होणार असलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत त्यांची मोठी कोंडी होणार आहे. वाचा: आपले हेच गाऱ्हाणे घेऊन त्यांनी सोमवारी पुन्हा कोरगावकर यांची भेट घेतली. त्यांनी ऐकून घेतले आणि वरिष्ठांना कळवितो, असे आश्वासन दिले. कोरगावकर यांनी पारनेरला जाऊन पूर्वीच मनोमिलन घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र यश आलेले नाही. औटी आणि मूळ शिवसेनेने त्यांना आता गृहित धरलेले नाही. तर राष्ट्रवादीचे लंके यांना जे साध्य करायचे होते, ते झाले आहे, त्यामुळे या पाच जणांवाचून त्यांनाही फारसा फरक पडेल, असे चित्र नाही. वाचा: स्थानिक पातळीवर ही स्थिती असताना आता वरिष्ठ पातळीवर यामध्ये लक्ष घालण्यासाठी कोणाला वेळ नाही. आता राजकारण आणखी पुढे गेले आहे. त्यामुळे काही दिवस थांबून पुन्हा सोडल्याशिवाय या नगरसेवकांपुढे आता पर्याय राहिला नसल्याचे दिसून येते. मात्र, यावरून पुन्हा दोन पक्षांत वितुष्ट निर्माण होण्याचीही शक्यता आहे.