पुणे: कार थांबवून मास्कबाबत विचारलं; मुजोर भावंडांनी केली पोलिसाला धक्काबुक्की - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, December 8, 2020

पुणे: कार थांबवून मास्कबाबत विचारलं; मुजोर भावंडांनी केली पोलिसाला धक्काबुक्की

https://ift.tt/3qFsoZJ
म. टा. प्रतिनिधी, मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करत असताना दोघांनी पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी दोघा भावडांना अटक केली आहे. सातारा रस्त्यावरील पुष्पमंगल चौकात रविवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. विनायक सर्जेराव पोळ (वय ३२, रा. किरकटवाडी) आणि नरेंद्र सर्जेराव पोळ (वय ३२, रा. आंबेगाव पठार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिस नाईक राहुल गोसावी यांनी तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गोसावी रविवारी सकाळी सातारा रस्त्यावरील पुष्पमंगल चौकात वाहतूक नियमन करीत होते. त्या वेळी भरधाव वेगात वाहन चालविणाऱ्या विनायकला त्यांनी थांबविले. त्या वेळी त्यांच्या मोटारीत तिघांनी मास्क घातले नव्हते. त्याबाबत विचारणा केली असता, दोघा भावडांसह मोटारीतील एका महिलेने राहुल यांना अपशब्द वापरून धक्काबुक्की केली. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.