नारदा घोटाळा : भाजपमध्ये एन्ट्री; सुवेंदू अधिकारींचा 'तो' व्हिडिओ गायब - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 21, 2020

नारदा घोटाळा : भाजपमध्ये एन्ट्री; सुवेंदू अधिकारींचा 'तो' व्हिडिओ गायब

https://ift.tt/3rgXbww
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील चर्चित नारदा घोटाळ्यातील एक आरोपी आणि तत्कालीन तृणमूल काँग्रेसचे नेते हे नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेत. गृहमंत्री यांच्या उपस्थितीत सुवेंदू अधिकारी यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपच्या यूट्यूब चॅनलवरून सुवेंदू अधिकारी यांचा नारदा घोटाळ्यासंबंधित व्हिडिओ अचानक 'गायब' झाला आहे. उल्लेखनीय म्हणजे, नारदा घोटाळ्यात ज्यांच्यावर आरोप आला ते सुवेंदू अधिकारी, तसंच शोभन चटर्जी हे आता भाजपच्या गोटात दाखल झालेले आहेत. नेते सुवेंदू अधिकारी यांचा नारदा घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप करणारा एक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला होता. या स्टिंगची टेप अनेक न्यूज चॅनेल्सना पाठवण्यात आली होती. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे काही नेते लाच घेताना या टेपमध्ये दिसत होते. हा व्हिडिओ भाजपच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरून शेअरही करण्यात आला होता. मात्र, सुवेंदू अधिकारी यांनी भाजपमध्ये एन्ट्री घेतल्या घेतल्या त्यांच्यावर आरोप करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावरून नाहिसा झालाय. मात्र, सोशल मीडियाच्या नजरेतून ही गोष्ट सुटणं कसं शक्य आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार यांनीही यावरून गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधलाय. 'भाजपच्या यूटयूब चॅनलवरून कथित नारदा घोटाळ्याचा व्हिडिओ काढून टाकण्यात आलाय. अमित शहा यांची जादूची लॉन्ड्री मोहीम पश्चिम बंगालमध्ये सुरू आहे. भाजपमध्ये सामील व्हा - धुतल्या तांदळासारखे स्वच्छ बाहेर या' असा टोला महुआ मोईत्रा यांनी हाणलाय. काय आहे ? २०१६ सालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी 'नारदा'च्या एका स्टिंग ऑपरेशनचा हा व्हिडिओ होता. या व्हिडिओत खासदार आणि मंत्र्यांसहीत अनेक तृणमूल काँग्रेसचे नेते कथितरित्या कॅमेऱ्यात लाच घेताना दिसले होते. यासंबंधात गेल्या महिन्यात अंमलबजावणी संचालनालयाकडून तृणमूलच्या तीन नेत्यांना नोटीस पाठवत कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती. सीबीआय आणि ईडीकडून या प्रकरणांची चौकशी सुरू आहे. सीबीआयकडून या कथित मनी लॉन्ड्रींग प्रकरणात १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये मदन मित्रा, मुकूल रॉय (हेही आता भाजपत दाखल झालेले आहेत), सौगता रॉय, सुलतान अहमद (२०१७ मध्ये निधन), इकबाल अहमद, काकोली घोष, प्रसून बंदोपाध्याय, सुवेंदू अधिकारी, शोभन चटर्जी (आता भाजपमध्ये) सुब्रत मुखर्जी, फरहाद हाकीम, अपरूपा पोड्डार आणि आईपीएस अधिकारी सय्यद हुसैन मिर्झा यांच्या नावाचा समावेश होता. राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यानंतर १६ डिसेंबर रोजी सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूल कॉंग्रेसशी संबंध तोडले. पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून तृणमूल कॉंग्रेसच्या तिकिटावर सुवेंदू अधिकारी निवडून आले होते.