: उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये प्लान्टमध्ये एक मोठा अपघात घडलाय. युरिया तयार करण्यात येणाऱ्या प्लान्टमध्ये रात्री उशिरा अमोनिया झाली आणि ही मोठी दुर्घटना घडलीय. () या दुर्घटनेत दोन अधिकाऱ्यांचा गुदरमरून मृत्यू झाला आहे. प्लान्टचे असिस्टंट मॅनेजर बी पी सिंह आणि डेप्युटी मॅनेजर अभिनंदन यांचा मृत्यू झाला आहे. तर गॅसमुळे अनेक जणांची प्रकृती बिघडलीय. या सर्वांना रुग्णालयात हलवण्यात आलंय. गॅस गळती झालेल्या परिसरात असलेल्या कर्मचाऱ्यांमधल्या १५ कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय. वाचा : वाचा : ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी प्लान्टमध्ये जवळपास १०० कर्मचारी-अधिकारी नाईट शिफ्टमध्ये काम करत होते. गॅस गळती झाल्याचं लक्षात येताच गोंधळाचं वातावरण तयार झालं. एव्हाना अमोनिया वायुमुळे श्वासोच्छवास कठीण झाल्यानं काही कर्मचारी तिथेच बेशुद्ध होऊन कोसळले. घाईघाईने मेडिकल टीमने सर्वांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. (IFFCO)चा हा प्लान्ट प्रयागराज जिल्हाधिकारी कार्यालयापासून जवळपास ४० किलोमीटर दूर फुलपूरमध्ये स्थिथ आहे. आशियातील ही एक अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते.