नवी दिल्ली : हरयाणाचे मंत्री अनिल वीज आढळलेत. यांनी स्वत: ट्विट करून यासंबंधात माहिती दिलीय. नवी दिल्ली : हरयाणाचे मंत्री अनिल वीज करोना संक्रमित आढळलेत. अनिल वीज यांनी स्वत: ट्विट करून यासंबंधात माहिती दिलीय. उल्लेखनीय म्हणजे, नोव्हेंबर महिन्यात करोनाच्या भारतीय लस असलेल्या 'कोव्हॅक्सीन'च्या चाचणी टप्प्यात अनिल वीज यांनी सहभाग घेतला होता. अनिल वीज यांना सध्या अंबाला कॅन्टच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. कोविड प्रोटोकॉलप्रमाणे आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना करोना चाचणी करवून घेण्याचं आवाहन वीज यांनी केलंय. अनिल वीज कोविड पॉझिटिव्ह आढळणं हा सोशल मीडियावरील चर्चेचा विषय ठरलाय. याचं कारण म्हणजे, ही भारत बायोटेकची लस चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. 'कोव्हॅक्सीन' लस घेऊनही अनिल वीज करोना संक्रमित आढळल्यानं लशीच्या परिणामकारकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतंय.