Live : शेतकरी आंदोलनाचा धसका, अमित शहा पंतप्रधानांच्या भेटीला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, December 5, 2020

Live : शेतकरी आंदोलनाचा धसका, अमित शहा पंतप्रधानांच्या भेटीला

https://ift.tt/33MWT6d
नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर जवळपास आठवड्याभरापासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आज आणि केंद्रीय मंत्री यांच्यात पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. आज (शनिवारी) या आंदोलनाचा नववा दिवस आहे. वाचा : वाचा : LIVE अपडेट : या चर्चेच्या अगोदर केंद्रीय गृहमंत्री , संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर तसंच वाणिज्य मंत्री पीयूष गोयल हे केंद्रातील बडे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी पोहचले आहेत. - केंद्र सरकारनं तीन्ही काळे कायदे मागे घेत किमान हमीभाव देण्यावर लिखित आश्वासन द्यावं. आजच्या चर्चेत काही तोडगा निघाला नाही तर राजस्थानातूनही शेतकरी राष्ट्रीय महामार्ग ८ वरून दिल्लीकडे कूच करतीय : रामपाल जाट, अध्यक्ष, किसान महापंचायत - आज दुपारी २.०० वाजता शेतकऱ्यांसोबत बैठक होणार आहे. शेतकरी सकारात्मक पद्धतीनं विचार करत आपलं आंदोलन मागे घेतील अशी मला आशा आहे : कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर वाचा : वाचा : - आज होणाऱ्या पाचव्या चर्चेत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतील, अशी आशा भारतीय किसान युनियन नेते राकेश टिकैत यांनी व्यक्त केलीय. - आज शेतकऱ्यांकडून केंद्र सरकार आणि सरकारच्या कॉर्पोरेट धोरणांचा निषेध केला जाणार आहे. - शेतकरी संघटनांकडून येत्या मंगळवारी म्हणजेच ८ डिसेंबर रोजी भारत बंदचं आवाहन करण्यात आलंय. - याअगोदर ३ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांच्या मागण्ययांवर विचार करण्याचं आश्वासन दिलं होतं. वाचा : वाचा :