बीड: रासपचे आमदार यांना ईडीने जोरदार दणका दिला आहे. शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कर्ज घेऊन ती रक्कम विविध कंपन्यांमध्ये गुंतवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ईडीने तात्काळ कारवाई केली. काल रात्री उशिरा गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड या कंपनीची परभणी, बीड आणि धुळ्यातील जवळपास २५५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. त्यामुळे गुट्टे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.