बापरे! अमेरिकेत करोनानंतर वेगाने फैलावतोय मेंदू कुरतडणारा अमिबा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, December 24, 2020

बापरे! अमेरिकेत करोनानंतर वेगाने फैलावतोय मेंदू कुरतडणारा अमिबा

https://ift.tt/3pm4v84
वॉशिंग्टन: करोना महासाथीच्या आजारासोबत दोन हात करत असलेल्या अमेरिकेत आणखी एक नवीन संकट आले आहे. अमेरिकेत मेंदू कुरतडणारा घातक अमिबा नेगलेरिया फाउलरली (Naegleria fowleri) वेगाने फैलावत आहे. या अमिबाचा प्रसार दक्षिणेतील राज्यांपासून झाला. आता उत्तर अमेरिकेतही हा अमिबा आढळत आहे. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेंशनच्या (सीडीसी) एका अहवालात ही बाब नमूद केली आहे. अमेरिकेतील मध्यवर्ती पश्चिमी राज्यांमध्येही नेगलेरिया फाउलरली अमिबाची प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. यामध्ये मिन्नेसोटा, कंसास आणि इंडियानामध्ये सहा प्रकरणे आढळली आहेत. सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार, हा माती, गरम पाण्यांचे झरे, नदी आदी ठिकाणी आढळतो. ९७ टक्के बाधितांना वाचवणे कठीण? सीडीसीने म्हटले की, Naegleria fowleri अमिबा घातक आहे. याची लागण झालेल्या व्यक्तिंचे प्राण वाचवणे कठीण असते. जवळपास २ ते ४ टक्केजणांचे प्राण वाचवण्यात यश आले. यासारख्या जीवघेण्या अमिबाची बाधा जलतरणादरम्यान होण्याची शक्यता अधिक असते. नाकातून मेंदूपर्यंत पोहचतो हा सु्क्ष्मजंतू मेंदू खाणारा सुक्ष्म जीव आहे. या सुक्ष्मजंतूला नायलेरिया फोवलेरी असे म्हटले जाते. नाकाच्या माध्यमातून हा सुक्ष्मजंतू शरीरात प्रवेश करतो आणि मेंदूपर्यंत पोहचतो. वाचा: दुर्मिळ प्रकरण पण पहिलीच घटना नाही अमेरिकेत होणाऱ्या सार्वजनिक पाणी पुरवठ्यातून सुक्ष्मजंतू आढळणे ही दुर्मिळ बाब आहे. याआधीदेखील हा जंतू आढळला होता. सीडीसीच्या संकेतस्थळानुसार, अमेरिकेतील सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेनुसार नळातून येणाऱ्या पाण्यात याआधीदेखील सुक्ष्मजंतू आढळला होता. वर्ष २०११ मध्ये आणि २०१३ मध्ये दक्षिण लुइसियानामध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्याशिवाय वर्ष २००३ मध्ये एरिजोनामध्ये एक जिओ-थर्मल पाणी पुरवठा यंत्रणेतून होणाऱ्या पाण्यात सुक्ष्मंजतू आढळला होता. १९७०-८० च्या दशकात ऑस्ट्रेलिया आणि २००८ मध्ये पाकिस्तानमध्ये हा सुक्ष्मजंतू आढळला होता.