'परळ ब्रँड' शिवसैनिक गेला! मोहन रावले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, December 19, 2020

'परळ ब्रँड' शिवसैनिक गेला! मोहन रावले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

https://ift.tt/3re2890
गोवा: आणि शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळातील एक शिलेदार म्हणून ओळखले जाणारे सर्वसामान्याचे नेते आणि परळ ब्रँड अशी ओळख असलेले मोहन यांचे गोव्यात निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त आहे. हे दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ते ५ वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. मुंबईतील परळ-लालबाग भागातील ते अत्यंत लोकप्रिय नेते होते. शिवसेनाप्रमुख बााळासाहेब ठाकरे यांचे रावले हे निकटवर्तीय समजले जात. मोहन रावले यांचे पार्थिव मुंबईत अंत्यविधीसाठी आज संध्याकाळी आणलं जाणार आहे. दादर मधील त्यांच्या घरी पार्थिव आणल्या नंतर त्यांची कर्मभूमी असलेल्या परळ शिवसेना शाखेत त्यांचे पार्थिव शिवसैनिकांना अंतीम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अत्यंत साधी राहणी आणि सर्वसामान्य लोकांपासून ते मोठ्या नेत्यांपर्यंत त्यांचा संपर्क दांडगा होता. मुंबईतील मराठीबहुल भागांमध्ये शिवसेना पक्ष वाढवण्या त्याचा वाटा मोठा होता. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत ही माहिती दिली. मोहन रावले गेले, असे सांगत कडवट शिवसैनिक, दिलदार दोस्त आणि शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले नेते असे वर्णन करत संजय राऊत यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मोहन रावले यांची 'परळ ब्रँड' शिवसैनिक हीच ओळख होती. मोहन रावले पाच वेळा खासदार झाले, मात्र अखेरपर्यंत ते सगळ्यांसाठी मोहनच राहिले असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. गिरणी कामगारांच्या आंदोलनात सहभाग पुरर्रचित मतदारसंघ झाल्यानंतर मात्र सन २००९ मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. गिरणगावाशी नाळ जुळलेले मोहन रावले नेहमीच कामगार आंदोलनात दिसत असत. अनेकदा त्यांनी गिरणीकामगारांच्या न्याय्यहक्कांसाठी आंदोलने केली आहेत. मोहन रावले यांनी सन १९७९-८४ या काळात भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद सांभाळले होते. पुढे १९९१ पासून ते २००९ पर्यंत सलग पाच वेळा दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले आहेत. मोहन रावले यांच्यावर झाली होची पक्षकारवाई कडवट शिवसैनिक आणि प्रसंगी आंदोलनांमध्ये रक्त सांडलेले मोहन रावले हे नंतरच्या काळात शिवसेनेपासून दूर जाऊ लागले. सन २०१३ मध्ये त्यांनी पक्ष नेतृत्वावर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करत पक्षाने त्यांची हकालपट्टी केली होती. असे असले तरी काही काळानंतर त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता.