भाजपच्या आत्मनिर्भर यात्रा मार्गावर 'स्वाभिमानी'चे 'कडकनाथ' आंदोलन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 27, 2020

भाजपच्या आत्मनिर्भर यात्रा मार्गावर 'स्वाभिमानी'चे 'कडकनाथ' आंदोलन

https://ift.tt/2WKiWqi
म. टा. प्रतिनिधी, : कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ व रयत क्रांती संघटनेने सुरू केलेल्या किसान आत्मनिर्भर यात्रेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कडकनाथ घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करीत प्रत्युत्तर दिले. कडकनाथ घोटाळ्यात फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना आमदार सदाभाऊ खोत यांनी नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी किसान आत्मनिर्भर यात्रेच्या मार्गात कडकनाथ कोंबड्या घेऊन आंदोलन केले. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्यासह १५ आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ रयत क्रांती संघटना आणि भाजपने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात किसान काढली. इस्लामपूरमध्ये रविवारी सायंकाळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या यात्रेचा समारोप होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या यात्रेला जोरदार विरोध केला आहे. आमदार सदाभाऊ खोत यांनी किसान आत्मनिर्भर यात्रा काढण्यापूर्वी कडकनाथ घोटाळ्यात फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले होते. अन्यथा आत्मनिर्भर यात्रेच्या समारोप सभेत कडकनाथ कोंबड्या सोडून आंदोलन करू, असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांची नजर होती. आत्मनिर्भर यात्रेला विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रविवारी सकाळी शहरातील स्टेशन चौकात एकत्र जमले होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तत्पूर्वी कार्यकर्त्यांनी कडकनाथ कोंबड्यांसह आंदोलन केले. कृषी कायद्यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत नवे कायदे मागे घेण्याची मागणी केली. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्यासह १५ आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, रविवारी सायंकाळी इस्लामपूरमध्ये होणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेतही स्वाभिमानीचे कार्यकर्ते गोंधळ घालण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांवर नजर ठेवली आहे.