नवी दिल्ली : कृषी कायद्याविरुद्ध शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान आज (रविवारी) सकाळी अचनाक राजधानी दिल्लीस्थित परिसरात दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रकाबगंज गुरुद्वारात माथा टेकत यांना नमन केलं. उल्लेखनीय म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यादरम्यान कोणत्याही पद्धतीची व्हीआयपी व्यवस्था तैनात करण्यात आली नव्हती. तसंच सामान्य जनतेला रोखण्यासाठी पोलिसांकडून कोणत्याही पद्धतीचा बंदोबस्त किंवा ट्राफीक बॅरियर लावण्यात आले नव्हते. वृत्तसंस्था पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींच्या गुरुद्वारा रकाबगंज इथल्या दौऱ्यात कोणतीही विशेष पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली नव्हती.