पत्नीने एकांतात भेटण्यास नकार दिला; कैदी पतीने गुप्तांग कापले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 27, 2020

पत्नीने एकांतात भेटण्यास नकार दिला; कैदी पतीने गुप्तांग कापले

https://ift.tt/34LqcXu
माद्रिद: पत्नीने एकांतात भेटण्यास नकार दिल्यामुळे एका कैद्याने आपले गुप्तांग कापले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या कैद्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तुरुंग अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीरातून अधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे या कैद्याची प्रकृती गंभीर आहे. हा कैदी मनोरुग्ण असल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना ख्रिसमसच्या एक दिवसआधी दक्षिण-पश्चिम स्पेनमधील कॅडिजजवळील प्यूर्टो डी सांता मारिया तुरुंगात घडली. तुरुंगातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कैद्याने आपल्या पत्नीला वैवाहिक भेटीसाठी (Conjugal Visits)वारंवार विचारणा केली होती. त्यावेळी पत्नाीने आपल्या पतीची मागणी धुडकावून लावली. पत्नीच्या नकारामुळे संतापलेल्या पतीने आपले गुप्तांग कापले. वाचा: तुरुंगात या कैद्याकडे धारदार शस्त्र कसे आले याबाबतही चौकशी करण्यात आली. या कैद्याने प्लास्टीकच्या एका तुकड्याला धारदार धातूसोबत जोडून चाकू त्याचा चाकू तयार केला. त्यानंतर सर्व सुरक्षा रक्षक निघून गेल्यानंतर त्याने स्वत:चे गुप्तांग कापले. वाचा: काय असते वैवाहिक मुलाखत? वैवाहिक मुलाखत (Conjugal Visits) मध्ये कैद्यांना आपल्या पत्नींसह काही तास एकांतात भेटण्याची सवलत दिली जाते. ही सुविधा फक्त तुरुंगात चांगली वागणूक असणाऱ्या कैद्यांना दिली जाते. युरोपातील अनेक देशांमध्ये ही सुविधा दिली जाते. त्यामुळे अनेक कैदी तुरुंगात शिक्षा भोगत असतानादेखील वडील बनतात.