
मेलबर्न : जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या मेलबर्न (Melbourne) मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. टॉस जिंकून फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भारताने १९५ धावांवर गुंडाळले. भारताकडून जलद गोलंदाज जसप्रित बुमराह ( )ने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर आर. अश्विनने ३ आणि मोहम्मद सिराज दोन विकेट घेतल्या. वाचा- पहिल्या दिवसावर भारताचे वचर्स्व राहिले. यात गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. बुमराहने पाचव्या ओव्हरमध्ये जो बर्न्सची विकेट घेत पहिले यश मिळून दिले. त्याच्या या कामगिरीनंतर भारतीय संघाच्या २०१८ मधील पहिल्या विजयाची सर्वांना आठवण आली. २०१८च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाने प्रथम कसोटी मालिका जिंकली होती. तेव्हा बॉक्सिंग डे कसोटीतील विजयाचा हिरो ठरला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीचा इतिहास जुना आहे. १९८५ साली प्रथम दोन्ही संघात अशी लढत झाली होती. त्यानंतर ८ वेळा भारतीय संघ बॉक्सिंग डे सामना खेळला आहे. पण प्रत्येक वेळी निराशा झाली होती. वाचा- भारताच्या गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉक्सिंग डे कसोटीत मात्र इतिहास बदलला गेला. या सामन्यात विजय मिळून भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली होती. पहिल्या डावात चेतेश्वर पुजारचे शतक आणि कोहलीच्या ८२ धावांच्या जोरावर भारताने ४४३ धावा केल्या. त्यानंतर बुमराहने ६ विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा १५१वर ऑल आउट केला. दुसऱ्या डावात भारताने १०६ धावांवर डाव घोषित केला आणि ऑस्ट्रेलियाला ३९९ धावांचे टार्गेट दिले. पण त्यांचा डावा २६१ वर संपुष्ठात आला. भारताने हा सामना १३७ धावांनी जिंकला. दुसऱ्या डावात बुमराहने ३ विकेट घेतल्या. त्याने एकूण सामन्यात ९ विकेट घेत सामनावीर पुरस्कार पटकावला. वाचा- आज पुन्हा एकदा बुमराहने पहिल्या डावात ४ विकेट घेत २०१८च्या कामगिरीचा आठवण करून दिली. मेलबर्न मध्ये सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा १९५ धावांवर ऑल आउट केला आणि भारताने दिवस अखेर १ बाद ३६ धावा केल्या.