लस द्या नाहीतर सैन्य करार मोडणार; अमेरिकेला 'या' देशाची धमकी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 28, 2020

लस द्या नाहीतर सैन्य करार मोडणार; अमेरिकेला 'या' देशाची धमकी

https://ift.tt/3rFDC19
मनीला: आम्हाला लस दिली नाही तर थेट सैन्य करारच रद्द करू अशी धमकीच फिलीपाइन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते यांनी अमेरिकेला दिली आहे. नव्या स्ट्रेनचा सामना करण्यासाठीही अमेरिकेने लस दिली देण्याची मागणी त्यांनी केली. लस मिळाली नाहीतर व्हिजिटींग फोर्सेस अॅग्रीमेंट रद्द करणार असल्याचे त्यांनी म्हटले. राष्ट्रपती दुतेर्ते यांनी म्हटले की, अमेरिकेसोबतचा सैन्य करार रद्द होण्याच्या उंबरठ्यावर आहे. हा करार मोडीत निघाल्यास अमेरिकन सैन्याला फिलीपाइन्स सोडून जावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. याआधीदेखील याच वर्षी दुतेर्ते यांनी अमेरिकेसोबतचा सैन्य करार रद्द करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर या आदेशात बदल करून करार सहा महिन्यांसाठी निलंबित केला होता. अमेरिका आणि फिलीपाइन्समधील सैन्य करारानुसार, अमेरिकन लष्करी जवान फिलीपाइन्समध्ये युद्ध सराव करू शकतात. वाचा: दुतेर्ते यांनी म्हटले की, जर अमेरिकन सरकार कमीत कमी दोन कोटी लस देण्यास असमर्थ ठरत असेल तर त्यांनी फिलीपाइन्स सोडून जावे, हीच बाब त्यांच्यासाठी चांगली आहे. लस नसेल त्यांनी देशात थांबूही नये, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला. वाचा: राष्ट्रपती दुतेर्ते यांनी राष्ट्रीय लसीकरण प्रमुखांना लस खरेदीसाठी खर्चाची चिंता न करण्याची सूचना केली आहे. ही एक आपात्कालीन परिस्थिती असून लस खरेदीला प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. वाचा: वक्तव्यांसाठी राष्ट्रपती दुतेर्ते प्रसिद्ध फिलीपाइन्सचे राष्ट्रपती दुतेर्ते आपल्या बेताल वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. याआधीदेखील त्यांनी वक्तव्य केली आहेत. मास्क संसर्गमुक्त करण्यासाठी नागरिकांनी पेट्रोलचा वापर करण्याची सूचना त्यांनी केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींनी हे वक्तव्य गंमतीत केले असल्याचे म्हटले होते. लॉकडाउन मोडणाऱ्या नागरिकांवर गोळ्या झाडण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यांच्या या आदेशाची जोरदार चर्चा झाली होती.