
मेलबर्न: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर उभा असला तरी त्यांना एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा जलद गोलंदाज उमेश यादवला तिसऱ्या दिवशी दुखापत झाली आणि त्याने मैदान सोडले. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात उमेशने जो बर्न्सची विकेट घेत संघाला पहिले यश मिळून दिले होते. वाचा- तिसऱ्या दिवशी भारताने ३२६ धावांच्या जोरावर पहिल्या डावात १३१ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला चौथ्या ओव्हरमध्ये उमेश यादवने पहिला धक्का दिला. त्याने जो बर्न्सला ४ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर डावातील आठवी आणि स्वत:ची चौथी ओव्हर टाकताना उमेशला दुखापत झाली. वाचा- उमेशला दुखापत झाल्याने वैद्यकीय पथक मैदानावर आले. पण थोड्यावेळातच उमेश लंगडत ड्रेसिंग रुममध्ये गेला. त्याची शिल्लक ओव्हर मोहम्मद सिराजने पूर्ण केली. मालिकेच्या आधी भारताचा जलद गोलंदाज इशांत शर्मा दुखापतीमुळे बाहेर झाला होता. तर पहिल्या कसोटीत चेंडू लागल्याने जलद गोलंदाज मोहम्मद शमी उर्वरीत मालिकेतून बाहेर पडला. वाचा- अशातच आता उमेश यादवच्या दुखापतीमुळे भारताची डोकेदुखी वाढू शकते. मेलबर्न कसोटीनंतर भारताला आणखी दोन सामने खेळायचे आहेत. शमीच्या जागी सिराजचा संघात समावेश करण्यात आला होता. भारताच्या अनुभवी जलद गोलंदाजांच्या दुखापतीमुळे टीम इंडियाची अडचण वाढू शकते.