अलर्ट! लंडनहून आलेल्या विमानातील पाच जण करोना संक्रमित - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, December 22, 2020

अलर्ट! लंडनहून आलेल्या विमानातील पाच जण करोना संक्रमित

https://ift.tt/2WznlfN
नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या करोना विषाणूनं सगळ्या जगातच एका नव्या धास्तीला जन्माला घातलंय. भारत सरकारनंही या नव्या करोना विषाणूच्या दहशतीत ब्रिटनवरून येणाऱ्या सगळ्या विमानांना तात्पुरती बंदी घातलीय. विमानांचं हे निलंबन मंगळवारी मध्यरात्रीपासून अंमलात येणार असून ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. परंतु, ही बंदी लागू होण्यापूर्वीच नवी दिल्ली विमानतळावर ब्रिटनहून दाखल झालेले पाच प्रवासी करोना संक्रमित असल्याचं आढळून आलंय. एकूण २६६ प्रवासी आणि क्रू मेम्बरसहीत ब्रिटनहून दिल्लीला दाखल झालेल्या विमानातील प्रवाशांची दिल्ली विमानतळावर (करोना चाचणी) करण्यात आली. या चाचणीत पाच जण आढळून आलेत. करोना संक्रमित आढळलेल्या पाचही जणांचे नमुने अधिक तपासणीसाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राकडे (NCDC) पाठवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय. ब्रिटनमध्ये थैमान घालणाऱ्या नव्या करोना विषाणूचं हे संक्रमण आहे का? हे तपासणीनंतर स्पष्ट होऊ शकेल. लंडनहून निघालेलं हे विमान सोमवारी-मंगळवारी रात्री दिल्ली विमानतळावर दाखल झालं होतं. कोव्हिड १९ नोडल अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना याविषयी माहिती दिली. करोना संक्रमित रुग्णांना उपचारासाठी केअर सेंटरमध्ये हलवण्यात आलं आहे. दरम्यान, दिल्लीचे आरोग्य मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन आठवड्यांत यूकेवरून दिल्लीला दाखल होणाऱ्या प्रवाशांच्या घरोघरी जाऊन करोना चाचणी करण्यात येणार असल्याचं म्हटलंय. या कारवाईला आजपासून सुरुवात करण्यात आलीय. असे जवळपास ६ ते ७ हजार लोक असू शकतात, असा अंदाज सरकारनं व्यक्त केलाय.