
नवी दिल्ली: टोकियो ऑलिम्पिकमधील सर्व पदक विजेते खेळाडू भारतात परतले आहेत. दिल्ली विमानतळावर , रवीकुमार दहिया, बजरंग पुनिया, लव्हलिन बोरर्गोहेन आणि पुरुष हॉकी संघाचे जोरदार स्वागत झाले. त्यानंतर सर्व खेळाडूंचे दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात अनुराग ठाकूर, किरण रिजिजू आणि इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष नरिंदर बत्रा उपस्थित होते. वाचा- देशाला अॅथलेटिक्समध्ये पहिले सुवर्णपदक जिंकून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा सर्वप्रथम व्यासपीठावर आला आणि त्याने सुवर्णपदक सर्वांना दाखवले. तो म्हणाला, हे माझे नाही तर संपूर्ण देशाचे पदक आहे. ज्या दिवसापासून हे पदक मिळाले आहे तेव्हापासून मी जेवलो नाही की नीट झोपू शकलो नाही. जेव्हा जेव्हा हे पदक पाहतो तेव्हा वाटते सर्व काही ठीक आहे. पदक मिळाल्यापासून ते खिशात ठेवून फिरतोय. तुम्ही दिलेल्या पाठिंब्याबद्दल खुप खुप धन्यवाद. ऑलिम्पिक माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी होती आणि ती मला गमवायची नव्हती. वाचा- काय म्हणाला थ्रो बद्दल नीरज अंतिम फेरीच्या वेळी थ्रोच्या आधी मी विचार केला की मला १०० टक्के द्यायचे आहे आणि कोणाला घाबरण्याची गरज नाही. मी सर्व युवकांना हेच सांगेन की, कोणाशी घाबरू नका. पहिला थ्रो केल्यानंतर मला वाटले की तो माझ्या बेस्ट थ्रो पेक्षा थोडासा कमी आहे. वाचा- मध्ये भारताने ऑलिम्पिकमधील आजवरची सर्वोत्तम कामगिरी केली. भारताने ७ पदक जिंकली. याआधी २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने ६ पदक जिंकली होत. भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळालेली पदक मीराबाई चानू, रौप्यपदक पीव्ही सिंधू, कांस्यपदक लव्हलिन बोर्गोहेन, कांस्यपदक रवीकुमार दहिया, रौप्यपदक पुरुष हॉकी संघ, कांस्यपदक बजरंग पुनिया, कांस्यपदक नीरज चोप्रा, सुवर्णपदक