
सिडनी: यजमान ऑस्ट्रेलिया आणि पाहूणे भारत यांच्यात आज तिसरा आणि अखेरचा टी-२० सामना होणार आहे. भारतीय संघाने मालिकेतील पहिल्या दोन लढतीत विजय मिळवून २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आजच्या सामन्यात जर विजय मिळवला तर जगातील कोणत्याही संघाला करता आली नाही अशी कामगिरी करण्याची संधी आहे. वाचा- मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेणाऱ्या टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाचा ३-० असा क्लीन स्वीप करण्याची संधी आहे. भारतीय संघाला सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर क्लीन स्वीप करता येऊ शकते. याआधी २०१६ साली भारतीय संघाने महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा ३-० असा पराभव केला होता. वाचा- आकडेवारीवर नजर टाकली तर ३ सामन्यांच्या टी-२० लढतीत ऑस्ट्रेलियाचा आतापर्यंत दोन वेळा व्हाइट वॉश झाला आहे. यातील एक भारतीय संघाने २०१६ साली तर दुसरा २०१८ साली पाकिस्तानने केला होता. यातील भारताने घरच्या मैदानावर तर पाकिस्तानने युएईमध्ये ऑस्ट्रेलियाचा क्लीन स्वीप केला होता. वाचा- टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाने ११ डिसेंबर २०१९ पासून एकही सामना गमावलेला नाही. या काळात एका सामन्याचा निकाल लागला नाही. तर न्यूझीलंडविरुद्ध झालेले दोन टाय सामने भारताने सुपर ओव्हरमध्ये जिंकले. आतापर्यंत भारताने सलग १० लढती जिंकल्या आहेत. आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवल्यास त्यांना अफगाणिस्तानच्या सलग ११ विजयाशी बरोबरी करता येईल. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विजय मिळवण्याचा विक्रम अफगाणिस्तानच्या नावावर आहे. त्यांनी सलग १२ लढती जिंकल्या आहेत.