धक्कादायक! गर्भवती तरुणीने लग्नासाठी लावला तगादा; बॉयफ्रेंडने फेकले अॅसिड - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, December 18, 2020

धक्कादायक! गर्भवती तरुणीने लग्नासाठी लावला तगादा; बॉयफ्रेंडने फेकले अॅसिड

https://ift.tt/37u2f8M
बरेली: उत्तर प्रदेशमधील बरेलीत धक्कादायक घटना घडली आहे. प्रेयसीने लग्नासाठी तगादा लावल्याने प्रियकराने तिच्यावर अॅसिड फेकले. या ती गंभीर जखमी झाली असून, जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पीडिता गरोदर होती. तिने लग्नासाठी त्याच्याकडे तगादा लावला होता. यावरून त्यांच्यात वाद झाला. पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार आणि केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणी महाविद्यालयात शिकत आहे. ती घरी परतत होती. त्याच दरम्यान आरोपीने तिला निर्जन ठिकाणी अडवले आणि तिच्यावर अॅसिडसारखा ज्वलनशील पदार्थ फेकला. यात ती जखमी झाली आहे. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. 'गरोदर असल्याने लग्नासाठी तरुणाकडे आग्रह धरला, मात्र, त्याने माझ्यावर ज्वलनशील पदार्थ फेकला, ' असा जबाब तिने दिला आहे. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे आरोपी महेश पाल उर्फ बंटू याच्याविरोधात भादंवि कलम ३७६, ३२६ ए, ३४३, ३१३ आणि कलम ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून, त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असे वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, 'दोन महिला कॉन्स्टेबल पीडितेला बुधवारी रात्री रुग्णालयात घेऊन आल्या होत्या. अॅसिडसारखा ज्वलनशील पदार्थ तिच्यावर फेकण्यात आले होते. तिच्यावर उपचार सुरू केले. तिच्या खांद्यावर आणि हातांवर जखमा झाल्या आहेत. उपचार सुरू असून, तिची प्रकृती आता स्थिर आहे.'