‘सत्यमेव जयते २'च्या सेटवर जॉन अब्राहमला दुखापत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 27, 2020

‘सत्यमेव जयते २'च्या सेटवर जॉन अब्राहमला दुखापत

https://ift.tt/3hmaKGc
मुंबई: बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमला ‘’ या चित्रपटाच्या सेटवर दुखापत झाली आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण सध्या वाराणसीत सुरु आहे. एका अॅक्शन सीनचं चित्रीकरण करताना त्याला दुखापत झाली. त्यामुळे चित्रीकरण अर्ध्यावरच थांबवावं लागलंय. या चित्रपटाचं शूटिंग काही दिवसांपूर्वी लखनऊ येथे झालं होतं. त्यानंतर सिनेमाची संपूर्ण टीम वाराणसीत पुढील चित्रीकरणासाठी आली होती. तिथे पहिल्याच दिवशी चेत सिंह किल्ल्याजवळ अॅक्शन सीन शूट करत असताना जॉनला दुखापत झाली. त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर त्याला सोडण्यात आलं आहे. जॉनला दुखापत झाल्याचं कळताच लोकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. सध्या बॅक टू बॅक शूटिंगमध्ये आहे. सध्या तो विश्रांती घेत असल्यामुळे आता त्याच्या चित्रीकरणाच्या वेळापत्रकात बदल होतील असंही बोललं जातंय.