IND vs AUS: नामुष्की ओढवलेल्या भारतीय संघाला बसला अजून एक मोठा धक्का - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, December 19, 2020

IND vs AUS: नामुष्की ओढवलेल्या भारतीय संघाला बसला अजून एक मोठा धक्का

https://ift.tt/2LMztYx
अॅडलेड : : आजच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघांवर सर्वात कमी धावसंख्या करण्याची नामुष्की ओढवली. पण त्याचवेळी भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे भारतीय संघ यावेळी मोठ्या अडचणीत सापडला आहे. भारतीय संघाला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या रुपात यावेळी मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले. कारण शमीला गंभीर दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळेच जायबंदी निवृत्त होऊन शमीला पेव्हेलियनमध्ये परतावे लागले होते. २२ व्या षटकातील पॅट कमिन्सने दुसरा चेंडू बाऊन्सर टाकला होता. हा चेंडू शमी चुकवायला गेला. पण त्यावेळी हा चेंडू शमीच्या उजव्या हातावर आदळल्याचे पाहायला मिळाले. शमीला जेव्हा दुखापत झाली तेव्हा भारताच्या डॉक्टरांनी मैदानात धाव घेतली आणि त्याच्यावर उपचार केले. कारण त्यावेळी शमीने फलंदाजी करणे महत्वाचे होते. कारण भारतीय संघासाठी प्रत्येक धाव महत्वाची होती. शमीलाही यावेळी खेळायचे होते. पण शमीला झालेली दुखापत एवढी गंभीर होती की, त्याचे दुखणे थांबतच नव्हते. त्यामुळे अखेर शमीला मैदान सोडावे लागले. त्यामुळे भारतासाठी हा एक मोठा धक्का असल्याचे समजले जात आहे. कारण शमीची दुखापत गंभीर असली आणि तो खेळू शकला नाही, तर भारतीय संघ अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे आता शमीच्या दुखापतीचा वैद्यकीय अहवाल आल्यावर, ही गोष्ट स्पष्ट होऊ शकेल. भारताने कालच्या १ बाद ९ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. काल भारताने ऑस्ट्र्लियाला १९१ धावांवर रोखले होते आणि ५३ धावांची महत्त्वाची आघाडी घेतली होती. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने कसोटीवर पकड मिळवली होती. पण दुसऱ्या डावात भारताची विकेट एका पाठोपाठ एक पडू लागल्या. भारतीय फलंदाजांनी फक्त हजेरी लावण्याचे काम केले. भारताला दुसऱ्या डावात अवघ्या ३६ धावा करता आल्या. भारताच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी धावसंख्येवर बाद होण्याच्या उंबरठ्यावर विराट कोहली आणि कंपनी उभी आहे. १९७४ साली इंग्लंड विरुद्ध भारताचा ४२ धावसंख्येवर ऑल आउट झाला होता. त्याआधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध १९७४ साली भारताचा डाव ५८ धावांवर संपुष्ठात आला होता.