नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलनाचा आजचा २९ वा दिवस आहे. कृषी कायद्याचे फायदे पटवून देण्यात आणि शेतकऱ्यांचं समाधास करण्यास मोदी सरकारला आत्तापर्यंत यश आलेलं नाही. याच दरम्यान देशातील शेतकऱ्यांशी संवाद डिजिटल माध्यमाद्वारे संवाद साधत आहेत. देशाचं पंतप्रधान पद तीन वेळा भूषवणारे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज ९६ वी जयंती आहे. '' म्हणून हा दिवस साजरा केला जातो. याच निमित्तानं दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले. (अपडेट बातमी पाहण्यासाठी पेज रिफ्रेश करा) LIVE अपडेटस् : - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, परिवहन मंत्री नितीन गडकरी हेदेखील वेगवेगळ्या स्थानांवरून या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासहीत सर्व केंद्रीय मंत्री, खासदार आणि आमदार या कार्यक्रमात उपस्थित आहेत - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हेदेखील या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत - पंतप्रधान शेतकरी योजनेच्या पुढील टप्प्यासाठी १८ हजार कोटी रुपयांची घोषणाही पंतप्रधान आजच्या कार्यक्रमात करण्याची शक्यता आहे