मी धोनी नाही, त्याच्या सारखा चपळ देखील नाही; पाहा Video - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 7, 2020

मी धोनी नाही, त्याच्या सारखा चपळ देखील नाही; पाहा Video

https://ift.tt/2JWtQWY
सिडनी: ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने शानदार विजय मिळवत मालिका देखील खिशात घातली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले १९५ धावांचे लक्ष्य भारताने अखेरच्या षठकात पार केले. भारताकडून अखेरच्या षटकात हार्दिक पंड्याने स्फोटक फलंदाजी केली आणि विजय मिळून दिला. त्याआधी शिखर धवनने अर्धशतक करून संघाच्या विजयाचा पाया रचला. वाचा- दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा माजी कर्णधार ( ) च्या नावाची चर्चा झाली. धोनीची विकेटकिपिंग ही जगातील सर्वात चपळ आणि वेगवान अशी होती. त्याच्या विकेटकिपिंगचे आज देखील उदाहरण दिले जाते. धोनीच्या नावाची चर्चा होण्याचे कारण म्हणजे दुसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने त्याची आठवण काढली. वाचा- भारताच्या डावात जेव्हा शिखर धवन फलंदाजी करत होता. तेव्हा ऑस्ट्रेलियाचा हंगामी कर्णधार याने त्याला स्टपिंग करण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी झाला नाही. तेव्हा विकेटच्या मागे उभ्या असलेला वेड म्हणाला, Not Dhoni, Not quick enough like dhon (मी धोनी नाही, त्याच्या सारखा चपळ नाही) या घटनेचा व्हिडिओ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शेअर केला आहे. यावर शिखर धवनला देखील हसू आवरता आले नाही. भारताला दोन वर्ल्डकप जिंकून देणारा धोनी जगातील सर्वोत्तम विकिटकिपर मानला जातो. त्याच्या सारखी चपळता अपवादात्मक खेळाडूंनी दाखवली आहे. त्यामुळेच की काय जेव्हा शिखर धवनला बाद करण्यात अपयश आले तेव्हा वेडने कबुली दिली की मी धोनी सारखा चपळ नाही. वाचा- सिडनीत झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने सहा विकेटनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत २० षटाकत ५ बाद १९४ धावा केल्या. हंगामी कर्णधार मॅथ्यू वेडने ५८ धावा केल्या. त्यानंतर भारतीय संघाने दोन चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवला.