पुलवामा : गोळीबारात जखमी झाल्यानंतर दोन दहशतवाद्यांचं आत्मसमर्पण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, January 30, 2021

पुलवामा : गोळीबारात जखमी झाल्यानंतर दोन दहशतवाद्यांचं आत्मसमर्पण

https://ift.tt/36q1sEW
श्रीनगर : जम्मू - काश्मीरच्या जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाला भागातील लेलहार गावात दहतवादी लपून बसल्याची सूचना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाकडून या संपूर्ण भागाला घेराव घालण्यात आला तसंच सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. शुक्रवारी जवळपास ८.३० वाजता दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलांवर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर चकमकीला सुरूवात झाली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा झालेल्या या गोळीबारानंतर दोन्ही दहशतवाद्यांनी आपल्या एके ४७ रायफलसहीत सुरक्षा दलासमोर आत्मसमर्पण केलं. आत्मसमर्पण करणारे दहशतवादी कोणत्या दहशतवादी संघटनांशी निगडीत आहेत, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. अकील अहमद लोन आणि रऊफ उल इस्लाम अशी या दोन दहशतवाद्यांची नावं असल्याचं समजतंय. सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकी दरम्यान अकीलच्या डाव्या पायात छर्रे घुसल्यानं तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.