'त्या' मृत्यूचा करोना लसीकरणाशी संबंध नाही, आरोग्य विभागाचा दावा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, January 21, 2021

'त्या' मृत्यूचा करोना लसीकरणाशी संबंध नाही, आरोग्य विभागाचा दावा

https://ift.tt/3bXnnqt
हैदराबाद : तेलंगणाच्या निर्मल जिल्ह्यात घेतल्यानंतर एका ४२ वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचं समोर येतंय. बुधवारी सकाळी छातीत दुखू लागल्यानंतर या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. परंतु, या मृत्यूचा कोव्हिड १९ लसीकरणाशी काहीही संबंध नसल्याचं आरोग्य विभागानं स्पष्ट केलंय. मिळालेल्या माहितीनुसार, या आरोग्य कर्मचाऱ्याला मंगळवारी सकाळी ११.३० वाजता जिल्ह्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर करोना लस देण्यात आली होती. बुधवारी पहाटेच २.३० वाजता त्याला छातीत दुखत असल्याचं जाणवलं. सकाळी जवळपास ५.३० वाजल्याच्या सुमारास त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य संचालक जी श्रीनिवास राव यांनी दिली. प्राथमिक माहितीनुसार, आरोग्य कर्मचाऱ्याच्या मृत्यूचा करोना लसीकरणाशी काहीही संबंध नाही. गाईडलाईन्सनुसार, डॉक्टरांच्या टीमकडून मृतदेहाचं शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होऊ शकेल, असंही डॉक्टरांनी म्हटलं. लसीकरणानंतर प्रतिकूल घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली जिल्ह्यातील AEFI (Adverse Events After Immunisation) समिती या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. या समितीकडून अहवाल केंद्रीय AEFI समितीकडे धाडला जाईल. देशात १६ जानेवारीपासून जगातील सर्वात मोठ्या कोव्हिड १९ लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला आहे.