बायडन यांनी सौदी अरेबिया, युएईला दिला धक्का; घेतला 'हा' मोठा निर्णय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, January 28, 2021

बायडन यांनी सौदी अरेबिया, युएईला दिला धक्का; घेतला 'हा' मोठा निर्णय

https://ift.tt/3cmriNR
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीला मोठा झटका दिला आहे. बायडन यांनी या देशांसोबतचा अब्जावधी डॉलरच्या शस्त्र विक्रीवर स्थगिती दिली आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळात झालेल्या शस्त्र विक्री करारांची समिक्षा करण्यात येत असल्याचे अमेरिकन सरकारने म्हटले आहे. या करारानुसार, अमेरिका युएईला एफ-३५ फायटर जेटही देणार होते. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथोनी ब्लिंकेन यांनी सांगितले की, याआधीच्या सरकारने केलेल्या शस्त्र विक्री कराराची समिक्षा केली जात आहे. हे आमच्या परराष्ट्र धोरणाच्या सुसंगत आहेत का, हेही पाहिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ट्रम्प प्रशासनाने केलेल्या शस्त्र विक्री कराराची समिक्षा होणे म्हणजे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात मोठा बदल करणार असल्याचे संकेत आहेत, असे म्हटले जाते. वाचा: याआधी वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या दिलेल्या वृत्तानुसार, बायडन प्रशासनाने सौदी अरेबियाला अंत्यत घातक शस्त्र आणि युएईला एफ-३५ विमान देण्याच्या करारावर अल्पकालिन बंदी घातली आहे. हा निर्णय घेण्याच्या एक आठवडा आधीच सौदी अरेबियासोबतच्या संबंधाबाबत अमेरिका समिक्षा करणार असल्याचे बायडन यांनी म्हटले होते. वाचा: याआधी ट्रम्प यांनी इराणवर अधिक दबाव निर्माण करण्यासाठी इस्रायल, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीसोबतचे संबंध अधिक घट्ट केले होते. अमेरिकेने संयुक्त अरब अमिरातीसोबतच्या एक लाख ७३ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक शस्त्र विक्रीला मंजुरी दिली होती. या करारानुसार, अमेरिका एफ-३५ आणि एमक्यू-९ रिपर ड्रोन युएईला देणार आहे.