निश्चित! पंतप्रधान नरेंद्र मोदी केव्हा घेणार करोना लस? जाणून घ्या... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, January 21, 2021

निश्चित! पंतप्रधान नरेंद्र मोदी केव्हा घेणार करोना लस? जाणून घ्या...

https://ift.tt/361Sb5J
नवी दिल्ली : देशात करोना लसीकरण मोहिमेला १६ जानेवारीपासून सुरुवात करण्यात आलीय. परंतु, खुद्द आणि इतर नेते या लसीकरण मोहिमेत का सहभागी झाले नाहीत? असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात होता. या निमित्तानं करोना लसीच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदीही लसीकरणात सहभागी होणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. करोना लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: लस टोचून घेणार आहे. याच टप्प्यात राज्याच्या मुख्यमंत्र्यांचंही लसीकरण होणार आहे. लोकांमध्ये असलेली करोना लसीबद्दलची साशंकता दूर करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्यासहीत आणि इतर नेतेही घेणार असल्याचं सांगण्यात येतंय. करोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ५० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींचं लसीकरण करण्यात येणार आहे. याच टप्प्यात सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, आणि ज्यांचं वय ५० वर्षांहून अधिक आहे अशांना करोना लस देण्यात येणार आहे. असं असलं तरी करोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला नेमकी कधी सुरुवात होणार, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. करोना लसीबद्दल असलेले भ्रम दूर करून लसीकरण मोहिमेला वेग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आत्तापर्यंत देशात एकूण ७ लाख ८६ हजार ८४२ जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आलाय. बुधवारी १ लाख १२ हजार ००७ जणांना लस देण्यात आली. सर्वाधिक म्हणज ३६ हजार २११ आरोग्य कर्मचाऱ्यांना कर्नाटकात लस देण्यात आलीय. त्यानंतर आंध्र प्रदेशात २२ हजार ५४८ तर महाराष्ट्रात १६ हजार २६१ आरोग्य कर्मचाऱ्यांना करोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.