धक्कादायक! अंधश्रद्धेचे भूत मानगुटीवर; आई-बापानंच केली २ मुलींची हत्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, January 26, 2021

धक्कादायक! अंधश्रद्धेचे भूत मानगुटीवर; आई-बापानंच केली २ मुलींची हत्या

https://ift.tt/39ij1c0
अमरावती: आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात अंधश्रद्धेचे भूत मानगुटीवर बसलेल्या उच्चशिक्षित आई-बापाने आपल्या पोटच्या दोन मुलींची त्रिशुलाने केली. कलियुग सत्ययुगात बदलणार असून, दैवी शक्तीने मुली काही तासांतच पुन्हा जिवंत होतील, असे त्यांना वाटले. दोघेही आरोपी उच्चशिक्षित आहेत. तरीही त्यांनी असे टोकाचे पाऊल का उचलले? याचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बापाने रविवारी रात्री आपल्या दोन्ही मुलींची हत्या केल्यानंतर स्वतःच आपल्या एका सहकाऱ्याला फोन करून त्याबाबत माहिती दिली होती. घटनेबाबत ऐकून मोठा धक्का बसलेल्या सहकाऱ्याने लगेच पोलिसांना माहिती दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. आई-बाप दोघेही बेशुद्धावस्थेत आढळून आले. मदनपल्लीचे डीएसपी रवि मनोहरचारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींच्या आईने दोघांची हत्या केली अशी माहिती मिळाली. एका मुलीची हत्या करण्याआधी तिचे मुंडन करण्यात आले होते. मुलींचा बाप हे सगळे बघत होता. तर आईनेच त्यांची हत्या केली. लहान मुलीला आधी त्रिशुलाने मारले. त्यानंतर मोठ्या मुलीची हत्या करण्यात आली. आई हायस्कूलमध्ये प्रिन्सिपल, तर वडील कॉलेजमध्ये व्हाइस प्रिन्सिपल पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, मुलींची हत्या केल्यानंतर स्वतःही आत्महत्या करणार होते. मात्र, पोलीस घटनास्थळी पोहोचले. व्ही. पुरुषोत्तम नायडू हा मदनपल्ली येथील सरकारी कॉलेजमध्ये व्हाइस प्रिन्सिपल आहे. तर स्थानिक हायस्कूलमध्ये प्रिन्सिपल आहे. त्यांची २७ वर्षीय मुलगी एलिकख्या भोपाळमध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत होती. तर दुसरी मुलगी दिव्या ही नोकरी करत होती. करोना काळात लॉकडाउनमध्ये दोन्ही मुली घरीच आपल्या आईवडिलांसोबत राहत होत्या. त्या पुन्हा जिवंत होतील... मारेकरी मात्यापित्याने पोलिसांना सांगितले की, 'एक दिवस वाट पाहा. त्यांच्या मुली पुन्हा जिवंत होतील. कलियुग सत्ययुगात बदलत आहे. मुली पुन्हा जिवंत होतील, असे वाटले.' दरम्यान, दोघेही सुशिक्षित आहेत. तरीही त्यांनी हे पाऊल का उचलले, याचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू केली आहे.