प्रजासत्ताक दिन : काश्मीर खोऱ्यात मोबाईल इंटरनेट सेवा स्थगित - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, January 26, 2021

प्रजासत्ताक दिन : काश्मीर खोऱ्यात मोबाईल इंटरनेट सेवा स्थगित

https://ift.tt/2YecicH
नवी दिल्ली : आज देशभरात ७२ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. राजधानी दिल्लीत अनेक कार्यक्रमांची रेलचेल आहे. राजपथावर प्रजासत्ताक दिनाची परेड संपल्यानंतर राजधानीत कृषी आंदोलनाविरुद्ध शेतकरी आंदोलक 'ट्रॅक्टर रॅली' काढणार आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीत अनेक घडामोडी घडत असतानाच दुसरीकडे संपूर्ण काश्मीर खोऱ्यातही खबरदारीचा सुरक्षेचा उपाय म्हणून मोबाईट इंटरनेट सेवा तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात आलीय. मुख्य प्रजासत्ताक दिनाचा सोहळा जम्मूच्या मौलाना आझाद स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. इथे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. व्यवस्था तैनात जम्मू काश्मीरमध्ये सोमवारपासून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलीय. गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या वातावरण शांत असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. प्रवासी तसंच खाजगी वाहनांची तपासणी, मोबाईल सिक्युरिटी बंकर, चेकपोस्ट, सीसीटीव्ही सर्व्हिलान्स, स्निफर डॉग अशी तंत्रज्ञानाचीही मदत घेतली जातेय. जम्मू आणि श्रीनगरमध्ये मुख्य परेडच्या आजूबाजूच्या भागांवरील उंच इमारतींवर शार्पशूटरही तैनात करण्यात आले आहेत. श्रीनगरचे सर्व प्रवेशद्वार सील करण्यात आले आहेत. तपासणीनंतरच वाहनांना शहरात प्रवेश दिला जात आहे. अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येत असल्याचंही पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरच्या ७१ पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव दरम्यान, गृह मंत्रालयाकडून प्रजासत्ताक दिनाला जम्मू-काश्मीर पोलिसांच्या ७१ अधिकारी आणि जवानांचा सन्मान करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तीन श्रेणींमध्ये सन्मान देण्यात येणार आहे. ५२ पोलीस अधिकारी आणि जवान शौर्यासाठी पोलीस मेडल दिले जातील. तर दोन अधिकाऱ्यांचा उल्लेखनीय सेवेबद्दल गौरव करण्यात येईल. याशिवाय उत्कृष्ट सेवेसाठी १७ अधिकारी व जवानांना पदक देऊन प्रोत्साहन दिलं जाणार आहे. जम्मू काश्मीरच्या वीराला 'शौर्यचक्र' जम्मू काश्मीरचे हुतात्मा इन्स्पेक्टर अर्शद खान यांना मरणोत्तर शौर्यचक्र देऊन अभिवादन केलं जाणार आहेत. १२ जून २०१९ मध्ये अनंतनाग भागात पाकिस्तानी दहशतद्यांना तोंड देताना अर्शद खान यांनी आपल्या छातीवर गोळ्या झेलल्या होत्या. या दहशतवादी हल्ल्यात एकूण सहा जवान शहीद झाले होते यांत अर्शद खान यांच्यासहीत पाच सीआरपीएफ जवानांचा समावेश होता.