गुजरात सरकारनं 'ड्रॅगन' फळाचं नामकरण 'कमलम' केलं कारण... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, January 20, 2021

गुजरात सरकारनं 'ड्रॅगन' फळाचं नामकरण 'कमलम' केलं कारण...

https://ift.tt/3sHA0Mf
अहमदाबाद : '' हे फळ तुम्हाला माहीत असेलच... पण गुजरातमध्ये मात्र हे फळ 'ड्रॅगन' नावानं नाही तर '' नावानं ओळखलं जाणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री यांनी मंगळवारी 'ड्रॅगन' फळाचं नाव बदलून 'कमलम' करण्याचा निर्णय जाहीर केलाय. गुजरात सरकारच्या म्हणण्यानुसार, 'ड्रॅगन' या फळाचा आकार कमळासारखा असल्यानं त्याचं नाव बदलून 'कमलम' करण्यात आलाय. ...म्हणून 'ड्रॅगन'च्या नावात बदल या फळाचं नाव बदलण्याची गरज का वाटली? याबद्दल बोलताना विजय रुपानी यांनी म्हटलं 'या फळाचं नाव चीनशी निगडीत असल्यानं आम्ही या फळाचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे'. कमलम : कमळाचं फूल संस्कृत भाषेत 'कमलम'चा अर्थ कमळाचं फूल असा होतो. नुकतंच हे फळ भारतात लोकप्रिय झालंय. अनेक ठिकाणी बाजारात हे फळ सहजगत्या उपलब्धही होतं. उष्णकटीबंधातील हे फळ आपल्या वेगळ्या चवीसाठी ओळखलं जातंय. कार्यालयाचं नावही 'कमलम' उल्लेखनीय म्हणजे, गेल्या काही वर्षांत गुजरातच्या कच्छ आणि नवसारी भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ड्रॅगन फळाचं उत्पादन घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ जुलै २०२० रोजी आपल्या 'मन की बात' कार्यक्रमात या फळाचा उल्लेख केला होता. तसंच गुजरातमध्ये भाजप कार्यायलयाचं नावही 'कमलम' आहे. भारतात गेल्या काही वर्षांत शहर, इमारती, वस्तू यांच्या नावांत बदल करण्याचा जोरदार ट्रेन्ड पाहायला मिळतोय. उत्तर प्रदेश आणि हैदराबाद हा ट्रेन्ड पाहायला मिळाला. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारकडून अनेक राज्यांची तसंच रेल्वे स्टेशन्सच्या नावांत बदल करण्यात आला. आता भाजपशासित गुजरातमध्ये फळाचंही नवं नामकरण करण्यात आलंय.