या गोष्टीमुळे संपूर्ण जग अजिंक्यचे कौतुक करतय; पाहा व्हिडिओ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, January 20, 2021

या गोष्टीमुळे संपूर्ण जग अजिंक्यचे कौतुक करतय; पाहा व्हिडिओ

https://ift.tt/3it1qAZ
नवी दिल्ली: sportsman spirt from भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा चौथ्या कसोटीत पराभव करून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २-१ने स्वत:कडे ठेवली. भारताच्या या विजयात कर्णधार (ajinkya rahane)चे कौतुक सर्वजण करत आहेत. मैदानावर ज्या पद्धतीने अजिंक्यने भारतीय संघाल पुढे नेले त्याबद्दल संपूर्ण जग त्याच्यावर कौतुकांचा वर्षावर करत आहे. पण अजिंक्यचे हे नेतृत्व फक्त मैदानावरच नाही तर मैदानाबाहेर देखील दिसते. वाचा- अजिंक्यकडे जितके चांगले नेतृत्व आहे त्याहून मोठे त्याचे मन असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. भारतीय संघाने विजेतेपद मिळवल्यानंतर अजिंक्यने विजयाची ट्रॉफी सर्व प्रथम कसोटीत पदार्पण करणाऱ्या टी नटराजन याच्या हातात दिली. अजिंक्य एवढ्यावरच थांबला नाही. त्याने प्रतिस्पर्धी संघातील नाथन लायनला एक भेट दिली ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. वाचा- सामना झाल्यानंतर प्रझेंटेशन दरम्यान अजिंक्यने ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नाथन लायनला बोलवले आणि भारतीय संघाची जर्सी त्याला भेट दिली. लायनचा हा १०० वा कसोटी सामना होता. भारताने भलेही ऑस्ट्रेलियाचा पराभव केला असला तरी अजिंक्यने त्याला टीम इंडियाच्या खेळाडूंनी स्वाक्षरी केलेली जर्सी भेट देऊन १००वा कसोटी सामन्याची खास भेट दिली. अजिंक्यने केलेल्या या गोष्टीचे सोशल मीडियावर खुप चर्चा होत आहे. खेळ म्हटला की जय-पराजय होणारच पण त्याच खेळभावना देखील महत्त्वाची असते आणि तिच अजिंक्य रहाणेने दाखवली असल्याचे क्रिकेट चाहते म्हणत आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने याबद्दल रहाणेचे कौतुक केले आहे.