लज्जास्पद! सासरी परतत असताना महिलेवर सामूहिक बलात्कार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, January 1, 2021

लज्जास्पद! सासरी परतत असताना महिलेवर सामूहिक बलात्कार

https://ift.tt/3rJ1Ebp
सीहोर: मध्य प्रदेशातील सीहोरमध्ये संतापजनक घटना घडली आहे. सासरी परतत असलेल्या महिलेवर करण्यात आला. या घटनेनंतर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. महिला बसमधून उतरल्यानंतर आरोपींनी तिला पकडले आणि त्यानंतर एका टपरीत नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. जिल्ह्यातील अहमदपूर परिसरात बुधवारी संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बैरसिया येथील राहणारी महिला आपल्या सासरी परतत होती. ती बसमधून खाली उतरल्यानंतर फोनवर बोलत होती. त्याचवेळी तिथे असलेल्या काही तरुणांनी तिला पाहिले. त्यातील तरुणांनी तिला पकडले आणि एका टपरीत घेऊन गेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर महिला स्वतः पोलीस ठाण्यात गेली. तिने आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. सीहोरचे पोलीस अधीक्षक एस. एस. चौहान यांनी सांगितले की, बुधवारी रात्री कारवाई करून सर्व पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.