GT vs CSK : गुजरातचा सर्वात मोठा विजय, चेन्नईचा 89 धावांनी पराभव, प्लेऑफमधून पॅकअप - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 22, 2026

GT vs CSK : गुजरातचा सर्वात मोठा विजय, चेन्नईचा 89 धावांनी पराभव, प्लेऑफमधून पॅकअप

GT vs CSK : गुजरातचा सर्वात मोठा विजय, चेन्नईचा 89 धावांनी पराभव, प्लेऑफमधून पॅकअप

आयपीएल 2026 स्पर्धेतील 66 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने शुबमन गिल याच्या नेतृत्वात धावांबाबत इतिहासातील आपला सर्वात मोठा विजय मिळवला आहे. गुजरातने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा 89 धावांनी धुव्वा उडवला आहे. शुबमन गिल, साई सुदर्शन आणि जोस बटलर या त्रिकुटाने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्ससमोर 230 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र विजयी धावांचा पाठलाग करताना चेन्नईला संपूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. गुजरातच्या गोलंदाजांनी चेन्नईवर एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला. गुजरातने चेन्नईचं 13.4 ओव्हरमध्ये 140 रन्सवर पॅकअप केलं. गुजरातने यासह 19 व्या मोसमातील आपला नववा विजय मिळवला. गुजरातने यासह या हंगामातील साखळी फेरीचा आपला शेवट विजयाने केला. तर पराभवासह चेन्नई सुपर किंग्सचं आव्हान संपुष्ठात आलं.

चेन्नई सलग तिसऱ्या हंगामात अपयशी

चेन्नईने 2023 साली महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात गुजरातला पराभूत करुन पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. त्यानंतर चेन्नई सलग तिसऱ्यांदा प्लेऑफमध्ये पोहचण्यात अपयशी ठरली आहे.

चेन्नईची गेल्या 3 मोसमातील कामगिरी

चॅम्पियन : 2023

पाचवं स्थान : 2024

दहावं स्थान :2025

साखळी फेरीतून बाहेर: 2026