युएईतील भारतीयांसाठी मोठी बातमी; सरकारने घेतला 'हा' निर्णय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, January 31, 2021

युएईतील भारतीयांसाठी मोठी बातमी; सरकारने घेतला 'हा' निर्णय

https://ift.tt/2MGljsA
दुबई: संयुक्त अरब अमिरातीमध्ये काम करणाऱ्या भारतीयांसह इतर देशांच्या नागरिकांसाठी मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. डॉक्टर, इंजिनीअर आदी विशेषज्ञांसह अन्य काही विदेशी नागरिकांना नागरिकत्व देण्याची घोषणा ‘संयुक्त अरब अमिराती’ने (यूएई) शनिवारी केली. ‘कोव्हिड-१९’दरम्यान अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. दुबईचे प्रशासक व देशाचे पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती शेख महंमद बिन अल मख्तूम यांनी याबाबत घोषणा करताना सांगितले, ‘कलाकार, लेखक, डॉक्टर, इंजिनीअर आणि शास्त्रज्ञ त्यांच्यासह कुटुंबीयांसाठी नागरिकत्वाकरिता अर्ज करू शकतात. ‘यूएई’चे नागरिक बनल्यानंतरही ते आपले जुने नागरिकत्व कायम ठवू शकतात.’ अर्थात, नागरिकत्व मिळणाऱ्यांना मूळ नागरिकांप्रमाणेच सर्वाधिकार मिळणार किंवा नाहीत, हे स्पष्ट होऊ शकले नाही. ‘यूएई’ने यापूर्वी १९७१मध्ये देशात सरकार स्थापनेसाठी मदत करणाऱ्या पॅलेस्टिनी व इतरांना नागरिकत्व दिले होते. त्यानंतर कालांतराने इतरांनाही नागरिकत्व दिले जात आहे. वाचा: वाचा: नियमात शिथिलता युएईची नागरिकता मिळणाऱ्या परदेशी नागरिकांनादेखील मूळ नागरिकांप्रमाणे अधिकार मिळणार का, याबाबत काहीही स्पष्ट करण्यात आले नाही. आतापर्यंत परदेशातील नागरिकांना फक्त नोकरी, कामानिमित्त व्हिसा दिला जात होता. या व्हिसाची मुदत संपल्यानंतर नुतनीकरण करण्यात येत होते. मागील काही काळात व्हिसा नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. जेणेकरून काही खास गुंतवणूकदार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना अधिक वेळ देशात वास्तव्य करता येऊ शकते.