धनंजय मुंडे प्रकरणावर सुप्रिया सुळेंनी मांडली परखड भूमिका - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, January 22, 2021

धनंजय मुंडे प्रकरणावर सुप्रिया सुळेंनी मांडली परखड भूमिका

https://ift.tt/3o0P9VC
कोल्हापूर: 'एखाद्या नेत्याला बदनाम करण्याची जी राज्यात मोहीम सुरू आहे, ती अतिशय दुर्देवी आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही,' अशी जोरदार टीका खासदार यांनी कोल्हापुरात केली. मंत्री यांच्यावर झालेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या सुळे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत भाष्य केलं. 'महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे. या राज्यात हनी ट्रॅपसारखे प्रकार योग्य नाहीत. कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात काय झालं, हे तपासण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. पोलिस त्यांचं काम करत आहेत. संबंधित महिलेने आरोप मागे घेतले आहेत. यामुळे हे प्रकरण गंभीर नसल्याचं स्पष्ट झालं आहे,' असं सुळे म्हणाल्या. शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्याची केंद्र सरकारची मानसिकता नाही, असा आरोप करून त्या म्हणाल्या, 'केवळ दिखावा म्हणून बैठका घेतल्या जात आहेत. त्यावर निर्णय काही होत नाही. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संवेदनशील नाही हेच सध्या दिसत आहे.' वाचा: