१४५ कोटींच्या घरात राहते प्रियांका, घराचे फोटो पाहिलेत का? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, January 29, 2021

१४५ कोटींच्या घरात राहते प्रियांका, घराचे फोटो पाहिलेत का?

https://ift.tt/2Mididj
लॉस एन्जेलिस- अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने बॉलिवूड ते हॉलीवूडपर्यंतच्या प्रवासाने अनेकांना प्रभावित केले आहे. प्रियांकाने २०१८ मध्ये हॉलिवूड गायक निक जोनसशी लग्न केलं. यानंतर दोघंही लॉस एन्जेलिस इथे राहू लागली. लॉस एन्जेलिसच्या सॅन फर्नांडो व्हॅली येथील ज्या घरात अभिनेत्री राहते ते घर कोणत्याही महालापेक्षा कमी सुंदर नाही. प्रियांका आणि निक अनेकदा त्यांचे घरातले फोटो शेअर करत असतात. आणि निक जोनास यांच्या घराची किंमत २० दशलक्ष डॉलर्स (सुमारे १४५ कोटी रुपये) आहे. २० हजार स्क्वेअर फूट एवढ्या मोठ्या घरात सात मास्टर बेडरूम आणि ११ बेडरूमसह एक स्विमिंग पूलही आहे. याशिवाय प्रियांका आणि निकच्या घरात अनेक सोयी-सुविधाही आहेत. प्रियांका आणि निकच्या घरात फायरप्लेस, म्युझिक रूम, जिम स्पेस, गॅरेज, किचन, थिएटर रूम, बार, इनडोअर बास्केटबॉल कोर्ट, गेम्स रूम देखील आहेत. या सर्व ठिकाणी बरीच मोकळी जागाही आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट खूप सुंदर दिसते. तीन एकरात पसरलेलं प्रियांका चोप्राचं घर इतकं भव्य आहे की काही वेळा तिच्या घरी जाहिराती आणि प्रमोशनचं शूटही केलं जातं. प्रियांकाच्या या घरात अनेक अद्यावत गोष्टी आहेत, ज्या या घराचं सौंदर्य खुलवण्यास आणखीन मदत करतात. असं म्हटलं जातं की निक जोनासच्या घरापासून काही किलोमीटर अंतरावर त्याचा मोठा भाऊ जो जोनास याचंही घर आहे. त्याने आपलं घर १४ दशलक्ष डॉलर्सला विकत घेतलं आहे. याशिवाय असंही वृत्त आहे की निक जोनासने त्याचं जुनं घर ६.५ दशलक्ष डॉलर्समध्ये विकत घेतलं होतं. जे त्याने नंतर ६.९ दशलक्ष डॉलर्सना विकलं. प्रियांका चोप्राच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर नुकताच तिचा 'द व्हाइट टायगर' सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. रामिन बहरानी दिग्दर्शित या सिनेमात राजकुमार राव आणि आदर्श गौरव यांच्यासह प्रियांकाही आहे. हा सिनेमा अरविंद अडीगा यांची प्रसिद्ध कादंबरी 'द व्हाइट टायगर' च्या कथेवर आधारित आहे.