गाझियाबाद: उत्तर प्रदेशातील (Ghaziabad) जिल्ह्यातील श्मशानघाटात सुरू असलेल्या बांधकामादरम्यान मुसळधार पावसामुळे कोसळून ८ लोकांचा मृत्यू झाला आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार, कोसळलेल्या ढिगाऱ्याखालून १८ लोकांना बाहेर काढण्यात आले असून अजूनही काही लोक ढिगाऱ्यात दबले गेले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (8 dead and many people injured after a at the crematorium in of ) घटनेची माहिती मिळताच बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. प्रभावी पद्धतीने बचावकार्य चालवण्याचे निर्देशही आदित्यनाथ यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाला दिले आहेत. लिंटरचे होत होते बांधकाम उत्तर प्रदेशातील औद्योगिक शहर आणि दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये ही दुर्घटना घडली आहे. मुरादनगरच्या स्मशानघाट परिसरात लिंटरचे बांधकाम सुरू होते. या वेळी पाऊस आल्याने लिंटर खाली कोसळले. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे या दुर्घटनेचे शिकार झालेले लोक स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आले होते. क्लिक करा आणि वाचा बातमी- क्लिक करा आणि वाचा बातमी- क्लिक करा आणि वाचा बातमी-