माथेफिरू मुलानेच केली जन्मदात्या आईची हत्या; मृतदेह अंगणातच जाळला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, January 31, 2021

माथेफिरू मुलानेच केली जन्मदात्या आईची हत्या; मृतदेह अंगणातच जाळला

https://ift.tt/3r5pbSB
चाइबासा: झारखंडमधील जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत जोजोगुट गावात माथेफिरू मुलाने जन्मदात्या आईची केली. त्यानंतर तिचा मृतदेह अंगणातच जाळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी जळालेल्या अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जन्मदात्या आईची हत्या केल्यानंतर आरोपी मुलाने अंगणातच तिचा मृतदेह जाळला. त्याच्या लहान भावाच्या पत्नीने या घटनेची माहिती शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी आरोपीला मारहाण केली. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती आरोपीच्या लहान भावाच्या पत्नीने शेजारी आणि इतर ग्रामस्थांना दिली. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तात्काळ ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतला आणि विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला, अशी माहिती मनोहरपूर पोलिसांनी दिली. वडिलांची हत्या केल्याचाही मुलावर आरोप आईची हत्या करणाऱ्या माथेफिरू तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. चार वर्षांपूर्वी वडिलांची हत्या केल्याचाही या तरुणावर आरोप झाला होता.