आव्हानं कितीही मोठी असली तरी ना आम्ही थांबणार, ना भारत : राष्ट्रपती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, January 29, 2021

आव्हानं कितीही मोठी असली तरी ना आम्ही थांबणार, ना भारत : राष्ट्रपती

https://ift.tt/3ckoPDC
नवी दिल्ली : आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झालीय. अधिवेशनाच्या सुरुवातीला यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित केलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधकांनी बहिष्कार घातलाय. महामारीच्या या लढाईच्या काळात आपण अनेक देशवासियांना अकाली गमावलं आहे. आपल्या सर्वांचे प्रिय नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधनही करोनाकाळातच झालं. संसदेचे सहा सदस्यही करोनामुळे अवेळी आपल्याला कायमचे सोडून गेले आहे. मी सर्वांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, असं म्हणत राष्ट्रपतींनी सुरुवातीलाच दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहिली. आव्हानं कितीही मोठी असली तरी ना आम्ही थांबणार ना भारत, असं म्हणत राष्ट्रपतींनी करोनाकाळातील आव्हानांचाही उल्लेख केला. आत्मनिर्भर भारत सरकारनं गरीब महिलांच्या जन धन खात्यात जवळपास ३१ हजार कोटी रुपये थेट हस्तांतरित केले. देशभरातील उज्ज्वला योजनेतील गरीब महिला लाभार्थ्यांना १४ कोटींहून अधिक मोफत गॅस सिलिंडर प्राप्त झाले. करोना काळात निर्माण झालेल्या जागतिक परिस्थितीत जेव्हा प्रत्येक देशाची प्राथमिकता 'देशातील गरजा' होत्या, तेव्हा आत्मनिर्भर भारताचं निर्माण इतकं महत्त्वाचं का आहे, याची आपल्याला आठवण करून दिली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपल्यासाठी ही अभिमानाची बाब आहे की आज भारत जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवत आहे. या मोहिमेसाठी वापरल्या जाणाऱ्या दोन्ही लसी भारतात तयार करण्यात आलेल्या आहेत. या संकटाच्या काळात भारतानं मानवतेचं कर्तव्य बजावत अनेक देशांना करोनना लसींचे लाखो डोस उपलब्ध करून दिले.