नवी दिल्ली : आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राजधानी दिल्लीत सुरूवात झालीय. या अधिवेशनासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, , गृहमंत्री अमित शहा संसदेत उपस्थित झाले आहेत. (अपडेट बातमी पाहण्यासाठी पेज रिफ्रेश करा) लाईव्ह राज्यसभा टीव्ही : LIVE अपडेट : - राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार ...हीच देशाची अपेक्षा : नरेंद्र मोदी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी मीडियाशी संवाद साधला. 'आज या दशकातील पहिल्या वहिल्या अधिवेशनाला सुरुवात होतेय. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे दशक अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी पाहिलेली स्वप्नं पूर्ण करण्याची एक सुवर्णसंधी देशासमोर आली आहे. या दशकाचा संपूर्ण वापर व्हायला हवा. हे ध्यानात ठेवूनच या अधिवेशनात पुढच्या दशकभराकडे लक्ष देणारी चर्चा व्हायला हवी. मला विश्वास आहे की नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपण आपलं योगदान देण्यात मागे राहणार नाही' असं यावेळी पंतप्रधानांनी म्हटलं. 'हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच २०२० साली अर्थमंत्र्यांना वेगवेगळे ४-५ मिनी बजेट पॅकेजच्या स्वरुपात सादर करावे लागले. या अर्थसंकल्पाकडे त्याच ४-५ मिनी बजेटचा एक भाग म्हणून पाहावं लागेल' असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. दरम्यान, विरोधी पक्षाच्या खासदारांनी मात्र शेतकरी आंदोलनाचे पोस्टर झळकावत आपला निषेध व्यक्त केला.