लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी बीएमसीची वेगळीच शक्कल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, January 21, 2021

लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी बीएमसीची वेगळीच शक्कल

https://ift.tt/3902NnI
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबईत दोन दिवसांच्या खंडानंतर पुन्हा लसीकरण सुरू झाले आहे. त्यास तुलनेने कमी प्रतिसाद मिळत असल्याने मुंबई पालिकेने वेगळीच शक्कल लढवली आहे. लसीकरणाचा कमी झालेला वेग वाढविण्यासाठी कोविन अॅपवर नोंदणी झालेल्या आरोग्यदूतांना जवळच्या कोणत्याही केंद्रावर लस टोचून घेण्याची सवलत देण्यात आली आहे. या ''च्या पर्यायातून मोठ्या संख्येत लसीकरण होईल, असा पालिकेचा दावा आहे. मुंबईत लसीकरणासाठी अॅपच्या आधारे नोंदणी केली जात आहे. मात्र त्यात काही तांत्रिक अडचणी आल्याने दोन दिवस लसीकरण स्थगित ठेवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा लसीकरण सुरू झाले असले तरी कमी प्रतिसाद मिळत असल्याने पालिकेने त्यावर नवीन पर्याय स्वीकारला आहे. त्यासाठीच नोंदणी झालेल्या आरोग्यदूतांनी जवळच्या कोणत्याही केंद्रावर जाऊन लस घेण्यास अनुमती देण्यात आली आहे. पालिका आठवड्यातून चार दिवस म्हणजे मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी लसीकरण मोहीम राबवणार आहे. तसेच ज्या केंद्रावर लस दिली जाणार आहे, त्या ठिकाणीच जाणे बंधनकारक होते. परंतु, त्यास कमी प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून त्यात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे लसीकरण प्रतिसाद वाढून संख्येत वाढ होऊ शकेल, असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नेमके किती लसीकरण? लसीकरण मोहीम सुरू झाली त्या दिवशी, १६ जानेवारीस ४ हजारांपैकी १,९२६ लोकांना लस दिली गेली. मंगळवारी, १९ जानेवारीस ३,२०० पैकी १,५९७ लोकांना लस देण्यात आली आहे.