
औरंगाबाद: सामाजिक न्यायमंत्री यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपामुळं उडालेला राजकीय धुरळा काहीसा शांत झाला आहे. तक्रारदार हिनं तक्रार मागे घेतल्यानं धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही मागे पडली आहे. राज्यातील सर्वच बड्या नेत्यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. धनंजय मुंडे यांची चुलत बहीण व राजकीय प्रतिस्पर्धी यांनी मात्र आजवर यावर मौन पाळलं होतं. आज प्रथमच त्यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ( reaction on Case) वाचा: येथे त्या पत्रकारांशी बोलत होत्या. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी अत्यंत समतोल प्रतिक्रिया दिली. 'हा विषय आता मागे पडला आहे. पण यावर पुन्हा पुन्हा बोलावं लागू नये म्हणून बोलते, असं सांगून त्या म्हणाल्या, 'नैतिक, कायदेशीर आणि तात्विकदृष्ट्या या गोष्टीचं समर्थन मी करू शकत नाही. मात्र, अशा गोष्टींमुळं एखाद्या कुटुंबाला, कुटुंबातील मुलांना काहीही कारण नसताना त्रास होतो. मी महिला बालकल्याण मंत्री म्हणून काम केलं आहे. एक नातं म्हणून आणि महिला म्हणून मी या सगळ्या गोष्टींकडे संवेदनशीलपणे पाहते. हा विषय कुणाचाही असता तरी राजकीय भांडवल केलं नसतं आणि करणारही नाही. मीडियानं देखील संवेदनशीलता दाखवून एकूण प्रकरणावर परिणाम होऊ नये हे पाहावं. बाकी सगळ्या गोष्टींचा निकाल भविष्यात लागेलच.' पंकजा मुंडे व धनंजय मुंडे हे एकमेकांचे राजकीय स्पर्धक आहेत. परळीतील प्रत्येक स्थानिक निवडणुकीकडं या दोघांतील वर्चस्वाची लढाई म्हणून पाहिलं जातं. मागील विधानसभा निवडणुकीत धनंजय यांनी पकंजा यांचा मोठ्या फरकानं पराभव केला होता. या निवडणुकीत वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यामुळं त्यांच्या संबंधात कमालीची कटुता निर्माण झाली होती. मात्र, धनंजय मुंडे यांच्या आजारपणात पंकजा यांनी आस्थेनं त्यांची विचारपूस केली होती. त्यानंतर ही कटुता काहीशी कमी झाल्याचं बोललं जात होतं. त्या पार्श्वभूमीवर पंकजा यांची ही प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जात आहे. वाचा: