मुंबई: क्राइम शो पाहून त्यांनी केलं १३ वर्षीय मुलाचं अपहरण, ३ तासांनी... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, January 25, 2021

मुंबई: क्राइम शो पाहून त्यांनी केलं १३ वर्षीय मुलाचं अपहरण, ३ तासांनी...

https://ift.tt/39YEJAJ
मुंबई: टीव्हीवरील क्राइम शो पाहून दोघांनी एका १३ वर्षीय मुलाचे केले. मुंबईतील मालाडमध्ये ही घटना घडली. त्यानंतर त्यांनी मुलाच्या पालकांकडे १० लाख रुपयांची खंडणी मागितली. पोलिसांनी तपास करत अवघ्या तीन तासांत अपहृत मुलाची सुटका केली. परिसरातील आदर्श नगरमध्ये घरासमोर खेळत असलेल्या १३ वर्षांच्या मुलाचे दोघा जणांनी अपहरण केले. टीव्हीवर क्राइम शो बघून त्यांनी हे कृत्य केले. त्याला रिक्षातून पळवून नेले. त्यानंतर पालकांना फोन करून त्यांच्याकडे १० लाख रुपयांची खंडणी मागितली. पोलिसांनी तपास करून अवघ्या तीन तासांत अपहरणकर्त्यांना अटक केली आणि मुलाची सुखरूप सुटका केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर विश्वकर्मा (वय ३५) आणि दिव्यांशू विश्वकर्मा (वय २१) अशी दोघा आरोपींची नावे आहेत. मुलाचे अपहरण केले असून, त्याच्या सुटकेसाठी १० लाख रुपये द्या, असे अपहरणकर्त्यांनी मुलाच्या पालकांना फोनद्वारे सांगितले. पालकांनी ताबडतोब पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी तपास सुरू केला. अपहरणकर्त्यांच्या मोबाइल फोन लोकेशनच्या आधारे पोलिसांनी मालाड पश्चिम परिसरातून त्यांना अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.