जिनपिंग यांचा इशारा, शीत युद्ध सुरू झाल्यास... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, January 26, 2021

जिनपिंग यांचा इशारा, शीत युद्ध सुरू झाल्यास...

https://ift.tt/2KOKXe5
दावोस: आक्रमक विस्तारवादी भूमिकेमुळे भारतासह इतर देशांसोबत तणाव निर्माण करणारे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी जगभरातील नेत्यांना सुरू न करण्याचे आवाहन केले आहे. शीत युद्ध सुरू झाल्यास संपूर्ण जगावर त्याचा परिणाम होणार असल्याचा इशारा जिनपिंग यांनी दिला. करोनाविरोधातील लढाईत आता प्राथमिक यश मिळाले असले तरी महासाथीच्या आजाराचा शेवट अद्याप दूर असल्याचे त्यांनी सांगितले. जागितक आर्थिक मंचाच्या (WEF) दावोस अजेंडा परिषदेतील विशेष भाषणात जिनपिंग बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की, छोटे गट बनवणे अथवा शीत युद्ध सुरू करणे, इतर देशांना धमकी देणे यामुळे जगाचे विभाजन होईल. जगात असलेल्या तणावामुळे प्रत्येक देशांचे नुकसान होणार असून नागरिकांच्या हितांचा बळी जाणार असल्याचे जिनपिंग यांनी म्हटले. वाचा: चीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये अधिक उदारमतवादी धोरणे आणणार असल्याचे संकेत शी जिनपिंग यांनी दिले. विज्ञान, तर्क आणि मानवतेच्या भावनांच्या आधारे जगाने कोविड-१९ च्या विरोधातील लढाईत आघाडी मिळवली आहे. करोना महासाथीचा अंत अजूनही दूर आहे. मात्र, त्यातही यश नक्कीच मिळेल असेही त्यांनी सांगितले. वाचा: वाचा: दूषित पूर्वग्रहांना दूर करण्याची गरज शांतता पूर्ण सह-अस्तित्व, परस्परिक लाभ आणि सहकार्याच्या मार्गावर जाण्यासाठी वैचारीक पूर्वग्रह सोडून देण्याचे आवाहन शी जिनपिंग यांनी केले. जिनपिंग यांनी सांगितले की, मतभेदांमुळे कोणाचे नुकसान होत नाही. मात्र, अंहकार पक्षपात आणि द्वेषामुळे अधिक नुकसान होते. सर्व देशांमध्ये लस वितरणासह विविध पावले उचलून जागतिक सहकार्य वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले. संवादाच्या माध्यमातून सर्व वाद सोडवता येऊ शकतात यावर चीनचा विश्वास असल्याचे जिनपिंग यांनी म्हटले.