Corona Vaccine : करोना लस घेण्यापूर्वी या दोन गोष्टी नक्की करा... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, January 28, 2021

Corona Vaccine : करोना लस घेण्यापूर्वी या दोन गोष्टी नक्की करा...

https://ift.tt/3ppSA9H
नवी दिल्ली : जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या करोना विषाणू संक्रमणाला आटोक्यात आणण्यासाठी अनेक देशांनी लस तयार करून लसीकरणाला प्रारंभ केलाय. भारतातही आत्तापर्यंत १९ लाखांहून अधिक जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत लस पोहचवण्याचा सरकारचा मानस आहे. पहिल्या टप्प्यात ही लस आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना देण्यात येणार आहे. गरजेची नुकत्याच समोर आलेल्या एका अभ्यासानुसार, लसीकरणात सहभागी झालेल्या नागरिकांना लसीचा फायदा तेव्हाच चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल जेव्हा ते दोन नियम कटाक्षानं पाळतील. करोना लसीचा शरीरावर चांगला परिणाम होण्यासाठी तुमच्या शरीराला पुरेशी झोप आणि व्यायामाची गरज आहे. अभ्यासानुसार, तुमच्या शरीराची योग्य प्रमाणात नेसल तर करोना लसीचा प्रभाव शरीरावर चांगल्या प्रमाणात दिसून येणार नाही. यासाठी तुम्हाला आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेकडेही ध्यान द्यावं लागेल. व्यायामाचा शरीराला होणार फायदा तणावाग्रस्त परिस्थितीत राहणं किंवा नैराश्येचा परिणामही तुमच्या शरीराच्या रोगप्रतिकार क्षमतेवर होतो. परंत, पुरेशा प्रमाणात झोप आणि दिवसात थोड्या प्रमाणात का होईना पण केल्यानं तुमची सुधारू शकते. मनोवैज्ञानिक विज्ञानावर आधारीत जर्नल 'पर्सपेक्टिव्ह'मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, घेण्यापूर्वीही तुम्ही चांगली झोप आणि व्यायाम सुरू ठेवणं गरजेचं आहे. करोना लस घेण्यापूर्वीचे दोन दिवस तरी तुम्हाला पुरेशा प्रमाणात झोप मिळालेली असायला हवी. अर्थात कमीत कमी आठ तासांची झोप झालेली असेल याची खात्री करून घ्या. व्यायामाचाही शरीरावर चांगला परिणाम दिसून येईल. चांगली झोप झाल्यानं शरीराच्या रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ होतेच सोबतच शरीरात अँटीबॉडीज तेजीनं तयार होतात. तर व्यायामाची रोगप्रतिकारक क्षमता कायम ठेवण्यात मदत होते. देशातील करोनाची आकडेवारी दरम्यान, देशात गेल्या बुधवारी एकूण ११,६६६ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले तर याच वेळेत तब्बल १४,३०१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बुधवारी एकूण १२३ मृत्यूंची नोंद करण्यात आलीय. आत्तापर्यंत देशात आढळलेल्या करोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ०७ लाख ०१ हजार १९३ वर पोहचलीय. यातील १ लाख ७३ हजार ७४० जणांवर उपचार सुरू आहेत. तर आत्तापर्यंत एकूण १ कोटी ०३ लाख ७३ हजार ६०६ रुग्णांनी करोनावर मात केलीय. आत्तापर्यंत करोनामुळे १ लाख ५३ हजार ८४७ जणांनी आपले प्राण गमावले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलीय.