नवी दिल्ली : माजी उपराष्ट्रपती यांनी बुधवारी आपली खंत व्यक्त केलीय. देशात काही लोकांकडून मुस्लिमांना 'परकं' करण्याचा संघटीत प्रयत्न सुरू आहे. परंतु, भारताचा बहुलतावादी समाज शतकानुशतकांचं वास्तव आहे, असंही हमीद अन्सारी यांनी म्हटलंय. '' या आपल्या पुस्तकाच्या परिचर्चेत बोलताना माजी उपराष्ट्रपतींनी आपलं मत व्यक्त केलंय. आपण आहोत, हे महत्त्वाचं नाही तर आपल्याकडची व्यावसायिक योग्यता महत्त्वाची आहे, असंही हमीद अन्सारी यांनी म्हटलंय. 'मुस्लिमांना परकं ठरवण्यासाठी काही खास वर्गाकडून संघटीत प्रयत्न केला जात आहे. मी या देशाचा नागरिक आहे की नाही? जर मी या देशाचा नागरिक असेल तर मलाही त्या सर्व गोष्टींचा लाभार्थी होण्याचा हक्क आहे, ज्या एखाद्याला नागरिकत्वामुळे मिळतात', असं म्हणत हमीद अन्सारी यांनी आपली नाराजीही व्यक्त केलीय. आपलं म्हणणं स्पष्ट न करताच 'भारतात बहुलतावादी समाज गेल्या वर्षांनुवर्ष अस्तित्वात आहे' असंही अन्सारी यांनी म्हटलं. या दरम्यान माजी केंद्रीय मंत्री यांनीही आपलं मत व्यक्त केलं. 'मी आणि अन्सारी दु:खी आहोत, कारण गेल्या काही वर्षांतील घटनाक्रमांमुळे मुस्लीम वर्गाला धोका निर्माण होत असल्याचं दिसून येतंय... या वर्गाला आपल्याला असलेल्या धोक्याची जाणीव आहे त्यामुळे ते मागे सरत आहेत' असंही चिदंबरम यांनी म्हटलंय. 'भारतात मुस्लीम ओळख असलेल्या व्यक्तींना जाणून-बुजून टार्गेट करण्यात येतंय आणि सद्य शासन त्यांना धूर्तपणे निशाण्यावर घेत आहे', असं म्हणत पी चिदंबरम यांनी थेट केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधलाय.